Chhatrapati Sambhajinagar Crime News: कोणी मौजमजा तर कुणी गलफ्रेंडसाठी तर कोणी कुटुंब चालवण्यासाठी चोरी (Crime) केल्याच्या घटना आपण नेहमीच पाहतो. मात्र छत्रपती संभाजीनगर शहर (Chhatrapati Sambhajinagar City)  पोलिसांनी पकडलेल्या एका चोराची कहाणी ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला. कारण हा चोर केवळ शौक म्हणून दुचाक्या चोरायच्या, परंतु त्या विकत नव्हता आणि जमा करून ठेवायचा. पोलिसांनी या रेकॉर्डवरील चोराला बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याच्याकडून नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. शिवाजी भिकनराव चव्हाण (वय 50 वर्षे, रा.उद्धवराव पाटील चौकाजवळ, हिमायतबाग) असे या चोराचे नाव आहे. 


गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांचे पथक शहरात गस्तीवर होते. यावेळी त्यांना एन-12, हडको, छत्रपतीनगर येथे भालेराव यांच्या पिठाच्या गिरणीमागे रिकाम्या प्लॉटवर काही दुचाकी उभ्या असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन विचारपूस केल्यावर या चोरीच्या दुचाकी असल्याचे चौकशीत समोर आले.  त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी शिवाजी चव्हाणला ताब्यात घेतले. तसेच त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याच्यावर एमआयडीसी सिडको, छावणी, एमआयडीसी वाळूज, सातारा, बेगमपुरा ठाण्यात सहा दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तसेच, त्याच्याकडे आणखी तीन दुचाकीही चोरीच्या आढळून आल्यात. मात्र, त्या कधी चोरलेल्या आहेत, याबाबत आरोपीलाही तारीख आणि ठिकाण सांगता न आल्यामुळे त्याबाबत गुन्हे नोंद आहेत की नाहीत, हे समजले नाही. 


केवळ शौक म्हणून दुचाक्या चोरायाचा! 


गुन्हे शाखेच्या पथकाने शिवाजी चव्हाणला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडे एकूण 9 चोरीच्या दुचाकी आढळून आल्या आहेत. त्यातील 6 दुचाकीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र शिवाजी हा चोरी केलेल्या दुचाकी कधीच विकत नव्हता. त्याचं कारण म्हणजे तो चोऱ्या पैश्यांसाठी नव्हे तर, तर फक्त शौक म्हणून चोऱ्या करतो. विशेष म्हणजे पोलिसांना हे कळल्यावर त्यांना देखील धक्का बसला होता. 


आतापर्यंत 21 गुन्हे दाखल! 


पोलिसांनी शवाजी चव्हाणकडून तीन लाख रुपयांच्या नऊ दुचाकी जप्त केल्या आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलेल्या नऊ दुचाकींपैकी सहा दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यांपैकी चार दुचाकी या 2023 मध्ये चोरी केलेल्या आहेत. तर शिवाजी भिकनराव चव्हाण हा रेकॉर्डवरील दुचाकी चोर आहे. तो मंडप डेकोरेटर्सकडे काम करतो. त्याच्याविरुद्ध आधीचे दुचाकी चोरीचे तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत. आता पुन्हा नऊ दुचाकी त्याच्याकडून जप्त केल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर आता एकूण 21 गुन्हे झाले आहेत. शिवाजी चव्हाणला अटक करण्याची कारवाई उपनिरीक्षक कल्याण शेळके, सहायक फौजदार शेख हबीब, विजय निकम, राजेंद्र साळुंके, संजय मुळे, संदीप सानप यांच्या पथकाने केली.


इतर महत्वाच्या बातम्या: 


धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याचा हात तुटलेला मृतदेह सापडला, प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय