Chhatrapati Sambhaji Nagar Crime : जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar)डॉक्टर पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या एक डॉक्टराचा रुग्णालय परिसरातीलच नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे अंगावर एकही कपडा नसलेला हा डॉक्टर रुग्णालयाच्या परिसरात फिरत होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा डॉक्टर औषधांचा नशा करतो आणि नशेत असतांना त्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. 


गेल्या दोन- तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पैठण तालुक्यातील बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टराचा असल्याचा दावा केला जात आहे. ज्यात एक शासकीय डॉक्टर अंगावर एकही कपडा नसताना रुग्णालय परिसरात फिरताना पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे हा व्हिडिओ बिडकीन ग्रामीण रुग्णालयातील आयसीयूमधील असल्याचे देखील बोलले जात आहे. संबंधित डॉक्टराला नशेची सवय असून, त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याचा देखील बोलले जात आहे. विशेष म्हणजे या डॉक्टराचे नग्न अवस्थेत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. 


घटना सीसीटीव्हीत कैद....


संबंधित डॉक्टर बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. अंगावरील कपडे काढून तो रुग्णालयाच्या परिसरात फिरत होता. ही सर्व घटना रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मात्र, रुग्णालयातून कुणीतरी हा व्हिडीओ लीक केला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 


ग्रामीण रुग्णालय चर्चेत....


मागील काही दिवसांपासून बिडकीन शासकीय रुग्णालय चर्चेत आहे. या रुग्णालयात डॉक्टरांकडून वेळेवर उपचार मिळत नसल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. सोबतच डॉक्टर वेळेवर येत नाही अशाही तक्रारी आहे. तर, अनेक डॉक्टर अपडाऊन करत असल्याने याचा फटका रुग्णांना बसत असल्याचा देखील आरोप केला जातो. असे असतानाच याच रुग्णालयातील एका डॉक्टरांचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.


वडील प्रेयसीसोबत, तर आई प्रियकरासोबत पळून गेली


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. आहे. राखी व संतोष (नावे बदललेली) या जोडप्याला तीन मुलं असूनही दोघांचेही बाहेर विवाहबाह्य संबंध सुरू झाले. त्यांनी मुलांकडे दुर्लक्ष सुरु केले होते. यातून अनेकदा मुलांना मारहाण करत होते. घरात सतत चिडचिडेपणा होत होता. काही दिवसांनी दोघेही घर सोडून निघून गेले. आई प्रियकरासोबत निघून गेल्याने, वडील देखील आपल्या प्रेयसीसोबत राहण्यासाठी कुठेतरी निघून गेले. तीन महिने झाले अजूनही आई-वडिलांनी आपल्या मुलांकडे एकदाही येऊन त्यांची विचारपूस केलेली नाही. दुसरीकडे, आई- वडिलांच्या प्रतीक्षेत मुलींच्या डोळ्यातील अश्रू क्षणभरही थांबलेले नाहीत. 


इतर महत्वाच्या बातम्या