Chhatrapati Sambhaji Nagar : राजकीय नेता म्हटले की, रुबाब आलाच. त्यात नेत्यांच्या महागडा फोन, कपडे अन् ब्रॅन्डेड बुटाची चर्चा नेहमीच पाहायला मिळते. दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) एका माजी महापौराच्या बुटाची अशीच काही चर्चा शहरभर पाहायला मिळत आहे. त्याच कारण देखील तसेच आहे. कारण या माजी महापौराचा बूट भटक्या कुत्र्यांनी घरासमोरून पळवला आणि त्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण महापालिका यंत्रणाच कामाला लागली आहे. विशेष म्हणजे तीन संशयित कुत्रेही पकडण्यात आली आहे. विशेष म्हणजे कुत्र्यांनी बूट पळवण्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
त्याचं झालं असे की, छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपला 15 हजारांचा बूट घरासमोर काढून ठेवला होता. दरम्यान यावेळी घराच्या दारासमोरून भटक्या कुत्र्याने तो बूट पळवला. जेव्हा घोडले यांना दारासमोर ठेवलेला बूट दिसून आला नाही, त्यावेळी त्यांनी आजूबाजूला त्याचा शोध घेतला. पण बूट काही सापडत नव्हता. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही तपासले. ज्यात त्यांचा 15 हजारांचा बूट घराच्या दारासमोरून दोन भटक्या कुत्र्याने पळवला असल्याचे समोर आले.
आता माजी महापौरांच्या घरासमोरून महागडा बूट कुत्र्यांनी पळवले म्हटल्यावर महापालिकेची यंत्रणा कामाला लागली. बूट चोरणारा कुत्रा शोधण्याच्या प्रयत्न सुरु झाला. दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारावर कुत्रा पकडणाऱ्या यंत्रणेने तीन संशयित कुत्र्यांना पकडले. पण बूट नेमका कोणत्या कुत्र्याने पळवला हे कसं शोधावे असा प्रश्न आता यंत्रणेला पडला आहे. तसेच बूट घेऊन जाणारा 'आरोपी' कुत्रा कोणता हे अद्यापही गुलदस्त्यातच असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
नंदकुमार घोडेलेंचा थेट पशुसंवर्धन विभागाला फोन
माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचे शहराजवळ असलेल्या इटखेडा भागात निवास्थान आहे. दरम्यान शनिवारी (10 जून) रोजी दिवसभरातील दौरा संपवून ते रात्री घरी आले. घरात जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपला बूट दारासमोर काढून ठेवला. जेव्हा घोडेले सकाळी पुन्हा घराबाहेर पडले तेव्हा त्यांना दारासमोरील एक बूट गायब असल्याचं दिसून आले. त्यामुळे त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. पण बूट सापडत नसल्याने त्यांनी सीसीटीव्हीची तपासणी केली. दरम्यान यावेळी बूट कुत्र्याने पळवून नेल्याचे समोर आले. त्यामुळे घोडेले यांनी तत्काळ महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाला फोन करून परिसरात मोकाट श्वान वाढले असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी सूचना केली. सोबतच आपला बूट श्वानाने नेल्याचेही तक्रार देखील केली. त्यानंतर संबधित विभागाने तत्काळ परिसरातील संशयित कुत्र्यांची धरपकड सुरु केली. ज्यात तीन संशयित कुत्रे पकडण्यात आले आहे. मात्र बूट पळवून नेणारा कुत्रा नेमका कोणता याचा अजूनही शोध घेतला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :