Ashadhi Wari 2023: श्री संत एकनाथ महाराज (Sant Eknath Maharaj) आणि श्री संत भगवानबाबा (Saint Bhagwan Baba) यांचा संत परंपरेतील संत भेट सोहळा मंगळवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पैठणच्या श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मिडसांगवी येथे पहिले रिंगण पार पडले. यावेळी वारकऱ्यांनी पारंपरिक टाळ मृदंगाच्या तालावर सादर केल्या. तर श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा आज बीड जिल्ह्यात चौथ्या मुक्कामासाठी तांब्याचं राक्षसभुवन या ठिकाणी मुक्कामासाठी दाखल होणार आहे.
शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज शनिवारी (10 जून) रोजी पंढरपूरकडे प्रस्थान केले. दरम्यान, या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी होताना पाहाला मिळाले. पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गावर एकूण पाच 'रिंगण सोहळे' होणार आहेत. ज्यात मंगळवारी (13 जून) रोजी मिडसावंगी येथे 'पहिले रिंगण' सोहळा पार पडला. मंगळवारी सकाळी भगवान गडाच नारायण स्वामी, महेंद्र महाराज, वाल्मीक चोपदार नामदेव संत विणेकरी यांनी संत परंपरेनुसार एकनाथ महाराज पवित्र पादुकांचे पूजन करून पालखी सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांचा मानाचा फेटा बांधून स्वागत झाले. तर यावेळी संत एकनाथ महाराज संत भगवान बाबा यांचा जयघोष करून हा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तमाही वातावरणात साजरा केला.
आज बीड जिल्ह्यात मुक्काम...
छत्रपती संभाजीनगर, नगर जिल्ह्याचा टप्पा पूर्ण करून बुधवारी (14 जून) रोजी संत एकनाथ महाराजांची पालखी सोहळा बीड जिल्ह्यात चौथ्या मुक्कामासाठी तांब्याचं राक्षसभुवन या ठिकाणी मुक्कामासाठी दाखल होणार आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती...
दुपारी मिडसांगवी येथे पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांसह पाथर्डी तालुका प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार श्याम वाडेकर, पं. स गटविकास अधिकारी जगदीश पालवे, आरोग्य अधिकारी भगवान दराडे, संतोष मुटकूळे सरपंच मुक्ताबाई मोहन हजारे यांच्यासह मिडसांगवी येथील विविध महाराज मंडळी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा संपन्न झाला. भाविकांनी या सोहळ्यासाठी मोठी गर्दी केली होती.
असे होणार पाच रिंगण सोहळे
पैठण ते पंढरपूर पालखी मार्गावर पाच 'रिंगण सोहळे' होणार आहेत. 13 जून रोजी मिडसावंगी येथे 'पहिले रिंगण' पार पडणार आहे. पारगाव घुमरे येथे 17 जूनला दुसरे तर 20 जून रोजी नांगरडोह गावात तिसरे रिंगण होईल. तर चौथे रिंगण 23 जूनला कव्हेदंड व पाचवे रिंगण 28 रोजी पंढरपूर येथे होणार आहे. 27 जून रोजी होळे येथील भीमा नदी पात्रात नाथांच्या पादुकांचा स्नान सोहळा होणार आहे. तसेच 29 जून रोजी पंढरपूर शहरात नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येणार आहे. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांची विठ्ठल मंदिरात समाधी आहे. 2 जुलै रोजी मंदिरात परंपरागत पद्धतीने भानुदास महाराज पुण्यतिथी साजरी करुन पालखी सोहळा परतीच्या प्रवासास रवाना होणार असल्याचे पालखी प्रमुख रघुनाथबुआ गोसावी यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या :
Ashadhi Wari 2023: संत एकनाथ महाराजांची पालखी गावकऱ्यांनी अडवली, पारंपारिक मार्गावरुन जाण्याची मागणी