परभणी - लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) आज महाराष्ट्रात दोन सभा होत असून नांदेडमधील सभेनंतर मोदींनी परभणीतील सभा गाजवली. महायुतीचे उमेदवार आणि रासपचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev jankar) यांच्या उमेदवारीसाठी मोदींनी परभणीत सभा घेत काँग्रेसवर निशाणा साधला. इंडिया आघाडीवर हल्लाबोल करताना, मोदींनी राज्यातील महायुती (Mahayuti) सरकार हे विकासाची कास धरुन राज्याचा विकास करत असल्याचे म्हटले. परभणीतील सभेत मोदींनी महादेव जानकर यांचा लहान भाऊ म्हणून उल्लेख केला. माझा लहान भाऊ महादेव जानकर, त्यांना संसदेत पाठवा, असे म्हणत मोदींनीभर मंचावर जानकरांना शिट्टी दिली. त्यावेळी, आनंदाच्या भरात जानकरांनी जोरजोराने ती शिट्टी वाजवली.   


परभणी लोकसभेसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होत असून महादेव जानकरांना शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय (बंडू) जाधव यांचं आवाहन आहे. मात्र, परभणीचे गत 2019 चे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर हेही यंदा महादेव जानकरांसोबत आहे. महायुतीतली राष्ट्रवादी काँग्रेसने येथील आपली जागा महादेव जानकर यांच्यासाठी सोडल्याने राजेश विटेकर हेही जानकरांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.त्यातच, आज नरेंद्र मोदींची सभा झाल्याने महायुतीच्या उमेदवारासह सर्वांचा उत्साह वाढला आहे. 


येत्या 26 एप्रिल रोजी परभणीसाठी मतदान होत आहे, त्यावेळी परभणीकरांनी महायुतीचे उमेदवार आणि माझे लहान भाऊ महादेव जानकर यांना निवडून द्या, असे आवाहन मोदींनी केल. मोदींनी लहान भाऊ म्हणतात महादेव जानकर यांनी आपल्या जागेवरुन उठून हात जोडून सर्वांना अभिवादन केले. यावेळी, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. विशेष म्हणजे, मोदींनी मंचावरच महादेव जानकरांच्या हातात, त्यांचं उमेदवारी चिन्ह असलेली शिट्टी दिली. तर, जानकरांनीही ती शिट्टी जोरजोरात वाजवून दाखवली.माझा लहान भाऊ विजयी होण्यासाठी, तुम्ही घरोघरी जाऊन मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी लोकांना मार्गदर्शन करावे, पोलिंग बुथवर जाऊन सर्वांचे मने जिंकावी लागतील. घरोघरी जाऊन सगळ्यांना सांगा की मोदीभाई परभणीत आले होते, सर्वांना मी नमस्कार केलाय, माझा हा नमस्कार तुम्ही प्रत्येक घरात पोहोचवा असेही मोदींनी म्हटले. 


 


दरम्यान, मोदींच्या भाषणापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाषण करताना, काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच, महायुती सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकासावरही भाष्य केलं. 


हेही वाचा


''इंडी आघाडीवाले 4 जूननंतर एकमेकांचे कपडे फाडतील, केसं ओढतील''; पंतप्रधान मोदींना 'गॅरंटी'


एनडीएवाले आपले कपडे फाडतील


नांदेडमधील सभेतही मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधींना वायनाडमध्ये संकट वाटत आहे. 26 एप्रिलमध्ये जसं वायनाडमध्ये मतदान होईल. त्यानंतर, राहुल गांधींसाठी आणखी एका जागेची घोषणा करुन त्यांना तिथून उमेदवारी दिली जाऊ शकते, असे मोदींनी म्हटले. तसेच, केरळच्या मुख्यमंत्र्यांचा दाखल देत काँग्रेस व इंडिया आघाडीला टोला लगावला. काँग्रेसचा परिवारच, या निवडणुकीत काँग्रेसला मत देणार नाही, अशी परिस्थिती आहे. कारण, जिथं ते राहतात तिथे काँग्रेसचा उमेदवारच नाही, अशी परिस्थिती काँग्रेसची कधी कुणी विचार केली होती का, असा सवालही मोदींनी विचारला. मित्रांनो, तुम्ही पाहा 4 जूननंतर इंडी आघाडी एकमेकांत लढत आहे. 4 जूननंतर हे सर्वजण एकमेकांचे कपडे फाडतील, एकमेकांचे केसं ओढतील, असा टोलाही मोदींनी नांदेडमधील सभेतून लगावला. 


मराठावाड्याचा विकास खुंटला


स्वातंत्र्यानंतर तब्बल 60 वर्षांनी कोट्यवधी गरीबांना शौचालय देण्याचं काम आम्ही केलं, त्यावरुनही काँग्रेसने खिल्ली उडवली. गरीब बँक खातं उघडून काय करणार, डिजिटल व्यवहार हा गरीब आणि अडाणी लोकांचं काम नाही, असे काँग्रेसमधील एक बडा नेता म्हणत होता. काँग्रेसवाल्यांना देशातील गरीबांवर विश्वास नाही. मग, तुम्ही काँग्रेसवर विश्वास ठेऊ शकता का?, असा सवाल मोदींनी विचारला. काँग्रेसने महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाचा गळा घोटण्याचं काम केलं आहे. काँग्रेसच्या धोरणामुळे शेतकरी गरीब झाला, उद्योगवाढीला चालना मिळाली नाही, असे म्हणत काँग्रेस आघाडीवर मोदींनी टीका केली.