छत्रपती संभाजीनगर : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर (Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) पॉवर ग्रिड ट्रान्समीमिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना (Jalna) ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतुक मंगळवारी म्हणजेच आज (21 नोव्हेंबर) आणि बुधवार (22 नोव्हेंबर) असे दोन दिवस दुपारी 12 ते 4 यावेळात बंद असेल. उर्वरित कालावधीत वाहतुक सुरळीत सुरु राहील. बंद कालावधीत पर्यायी मार्गावरुन वाहतुक वळविण्यात आली आहे,असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळविले आहे.

Continues below advertisement

पर्यायी मार्ग...

  • दोनही दिवस काम सुरु असलेल्या कालावधीत (दुपारी 12 ते 4) जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान, समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (IC-14) ते सावंगी इंटरचेंज (IC-16) दरम्यान नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतुक निधोना (जालना) इंटरचेंज IC-14 मधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग 753 A (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल. 

 

  • तर समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-14 या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल,असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक यांनी कळविले आहे. उर्वरीत कालावधीत वाहतुक सुरळीत सुरु राहिल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दोन दिवस दुपारी 12 ते 4 या वेळात मार्ग बंद...

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार 21 नोव्हेंबर, बुधवार 22 नोव्हेंबर, असे दोन दिवस दुपारी 12 ते 4 या वेळात होणार आहे. त्यामुळे या काळात वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Continues below advertisement

समृद्धी महामार्गावरून झालेली टोल वसुली महिनानिहाय :

  • डिसेंबर 2022 - 13,17,72,312 रुपये 
  • जानेवारी 2023 - 28,53,23,483 रुपये
  • फेब्रुवारी 2023 - 30,47,51, 967 रुपये
  • मार्च 2023 - 34, 23,03, 220 रुपये
  • एप्रिल 2023 - 33, 20, 28, 984 रुपये
  • मे  2023 - 36, 48, 40, 721 रुपये
  • जून 2023 - 39, 54, 01, 136 रुपये 
  • जुलै 2023 - 29, 12, 01, 38 रुपये

इतर महत्वाच्या बातम्या: 

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा टोल महसुलाचा सुस्साट प्रवास, 9 महिन्यात मिळाले 'इतके' उत्पन्न