Chhatrapati Sambhajinagar, Honour killing : "माझा नवरा पाणी पाणी म्हणत म्हणत मेला. ते पण माझा हात धरून माझ्यासमोर होता. माझा जीव त्यावेळेला तुटत होता. आमच्या लग्नाला आमच्या आई वडिलांचा विरोध होता. आमच्या चुलत भावांनी देखील विरोध केला होता. ते म्हणत होते ते आपल्या जातीचे नाहीत. त्यांची जात आपल्यासारखी नाही. तुम्हाला सैराटप्रमाणे मारुन टाकू अशा धमक्या येत होत्या", असं मत संभाजीनगरच्या ऑनर किलिंग केसमधील पीडित पत्नीने बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये जातीच्या अहंग


काय आहे संपूर्ण प्रकरण? 


आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावयावर चाकूने गंभीर वार करून हत्येचा प्रयत्न केला होता. शहरातील इंदिरानगरमध्ये 14 जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित मुरलीधर साळुंके हा तरुण गंभीर जखमी झाला होता. पोटात व छातीत खोलवर वार झाल्याने गुरुवारी घाटीच्या अतिदक्षता विभागात अमितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमितचे तिच्या बालपणीची मैत्रिण विद्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांचा धर्म वेगळा असल्याने कुटुंबीयांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. पण, घरच्यांचा विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले. पुढे अमितच्या कुटुंबीयांनी दोघांना स्वीकारल्याने 2 मे रोजी ते घरी परतले. मात्र, विद्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांनाही स्वीकारले नव्हते. तर, याउलट विद्याचे वडील आणि चुलत भाऊ अमितला जीवे मारण्याची धमकी देत होते. 


शेवटी कोणी प्रेम विवाह करण्याची हिंमत करणार नाही


पुढे बोलताना पीडित पत्नी म्हणाली, माझ्या नवऱ्याला त्यांच्या मित्रांनी झाडाखाली बोलावलं होतं. ते झाडा खाली गेले आणि लाईट गेली. गाडीवर बसलेले असताना मागून हल्लेखोर आले. त्यांच्या पोटात चाकू घातला. टोटल त्यांच्यावर आठ वार केले. ते खाली पडले तरी त्यांच्यावर वार करत राहिले.  नवरा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, आतडे बाहेर आले होते. त्यांना फाशीची शिक्षा झाला पाहिजे. एवढ करुन जरी ते मोकळं फिरत असतील तर याला काहीच अर्थ नाही. माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय, शेवटी कोणी प्रेम विवाह करण्याची हिंमत करणार नाही. 


मोठी बातमी: जात-धर्म न पाहता बालपणीच्या मैत्रिणीसोबत लगीनगाठ बांधली, जातअभिमान बाळगणाऱ्याने बापाने जावयालाच संपवलं