छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडून राज्याचा दौरा करण्यात येत आहे. दरम्यान, आज त्यांच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार आहे. तर, मनोज जरांगे यांच्या सभेचे वैजापूर येथे आयोजन करणाऱ्या आयोजकांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. यापूर्वी मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात ओबीसी विषयी प्रक्षेभक वक्तव्य केली असून, त्यामुळे ओबीसी समाजाची मने दुखावली असल्याचे निवेदन ओबीसी समाजातर्फे देण्यात आले आहे. याच निवेदनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या सभेचं आयोजन करणाऱ्या आयोजकांना नोटीस देण्यात आली आहे. आजची सभा शांततेत पार पाडावी, तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी आपण जबाबदार असाल असं वैजापूर पोलिसांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे.
पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, "या नोटीसद्वारे आयोजकांना कळवण्यात येते की, आपण 09 ऑक्टोबर रोजी वैजापुर शहरात पंचायत समिती समोर सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या आधी ओबीसी समाजाविरोधात प्रक्षोभक भाषण करून ओबीसी समाजाची मने दुखावले असल्याचे वैजापुर ओबीसी समाजाचे निवेदन प्राप्त झाले आहे. त्यामुळे, सभेचं कार्यक्रम आपण शांततेत पार पाडावा. या कार्यक्रमावेळी काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल. तसेच आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येवून सदर नोटीस त्यात पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात भव्य सभा...
मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी (10 ऑक्टोबर) शहरातील विभागीय क्रीडा संकुलावर जाहीर सभा होत आहे. या सभेला लाखाहून अधिक समाज बांधव हजेरी लावणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. अंतरवाली येथे 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जाहीर सभेचा हा ट्रेलर असणार आहे. अशी माहिती आयोजक मराठा क्रांती मोर्चाचे विजय काकडे पाटील आणि सुनील कोटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील सूतगिरणी चौकातील विभागीय क्रीडा संकुलावर 10 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा आयोजित करण्यात आली आहे. आयोजक विजय काकडे पाटील आणि सुनील कोटकर यांनी केला आहे. सभेला येणाऱ्या समाजबांधवाच्या वाहन पार्किंगची व्यवस्था कडा कार्यालयाच्या मैदानावर, जाबिंदा मैदानासह बीड बायपास रोडवर व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेसाठी पोलीस प्रशानाकडे परवानगी मागितली आहे. सांयकाळपर्यंत परवानगीचे पत्र मिळेल, असेही कोटकर यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या: