Ambadas Danve On Shinde-Fadnavis Government: शिंदे-फडणवीस सरकराने राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात शासन आपल्या दारी या नवीन उपक्रमाची सुरवात केली आहे. अनेक ठिकाणी या उपक्रमाअंर्तगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जाहीर सभा देखील होत आहे. यावरूनच विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहे. शासकीय-अधिकारी कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे पगार कापून शासन आपल्या दारी कार्यक्रमात पैशांची उधळपट्टी करण्यात येत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. दानवे हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना हा आरोप केला आहे. 


शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना अंबादास दानवे म्हणाले की, "शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून सरकारी पैशाची उधळपट्टी करण्यात येत आहे.  तसेच जाहिरातबाजीवर सरकार मोठ्याप्रमाणात खर्च करत आहे. पण प्रत्येक्षात जनतेच्या पदरात काहीच पडत नाही. अनेक ठिकाणी विहिरीचे पैसे मिळाले नाहीत, गोठ्याचे पैसे मिळाले नाहीत. मंजुरीच्या फाईली कित्येक दिवस पेंडिंग आहेत. शासन आपल्या दारी म्हणजे नुसता शो आहे. तर शासन अपल्या दारी कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन तास उशिरा आले. फक्त 40 मिनिटं थांबले आणि गेले. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एक-एक दिवसाचा पगार कपात केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलं आहे. शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून पैसे जमा करून कार्यक्रमासाठी लोकांना जमा करण्यात आले. त्यामुळे हे शासन आपल्या दारी नसून, यांनी महाराष्ट्रचं शासन नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या दारावर नेऊन टाकलं असल्याचं दानवे म्हणाले. 


मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे राज्यभरात कार्यक्रम 


शिंदे-फडणवीस यांच्याकडून 'शासन आपल्या दारी' ही योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यात शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील योजनेची माहिती नागरिकांना थेट गावात जाऊन दिली जात आहे. तर या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन सभा घेत आहे. या सभेतून सरकारने केलेल्या कामाची माहिती या दोन्ही नेत्यांकडून दिली जात आहे. विशेष म्हणजे याच सरकारी कार्यक्रमातून विरोधकांवर निशाणा साधण्याचे काम देखील करण्यात येत आहे.


नांदेडमध्ये जोरदार सभा...


गेल्या आठवड्यात नांदेड येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. दरम्यान याच कार्यक्रमात हजारो लाभार्त्यांना वेगवेगळ्या योजनेचे लाभ मिळाले. तर यावेळी शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक मंत्री देखील उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्याप्रमणात गर्दी देखील पाहायला मिळाली. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nanded News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज नांदेड दौऱ्यावर; शहरातील सहा रस्त्यांवरील वाहतूक बंद, पोलिसांकडून पर्यायी रस्त्यांचे नियोजन