छत्रपती संभजीनगर :  इसिस (ISIS)  संघटनेचे जाळे छत्रपती संभाजीनगरातही पसरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. किमान 50 पेक्षा अधिक तरुण इसिसच्या संपर्कात आहेत. 12 फेब्रुवारी 2024 रोजी शहरातील हसूल परिसरातील बेरीबाग परिसरातून एनआयएने मोहमद जोएब खानला  अटक केली होती. त्यारगाविरुद्ध शुक्रवारी मुंबईतील एनआयएच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यात संभाजीनगरातून सुरू असलेल्या इसिसच्या कारवायांची ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


लिबियातून मोहमद जोएब जगभरात इसिसचे जाळे पसरवणारा मोहंमद शोएब खानने आयटी इंजिनिअर असलेल्या जोएबची भरती केली होती. जोएब त्याच्यासाठी स्लिपरसेल माणून काम करत होता. देशातील संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी जोप्ट्वच्या मदतीने शोएबने माथेफिरू तरुणांची टोळी तयार केली होती. भारतात मोठ्या घातपाती कारवाया करून अफगाणिस्तान किंवा तुर्कियेत पळून जाण्याचा कट रचण्यात आला होता. लिबियाचा शोएब आणि छत्रपती संभाजीनगरातील जोएब त्या कटाचे मुख्य सूत्रधार होते, असे या दोषारोपपत्रात म्हटले आहे. 


कोण आहे मोहम्मद जोएब खान?


 संभाजीनगरमधील  मोहम्मद जोएब खान (40 वर्षे) छत्रपती संभाजीनगरमधील   बेरीबाग परिसर राहत होता. बंगळुरूची वेब डेव्हलपरची  गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून तरुण अभियंता दहशतवादाकडे वळला.  इसिसचे ध्येय पूर्ण करण्याची घेतली शपथही घेतली.  अर्धेअधिक कुटुंब इस्लामिक देशांमध्ये आहेय 
महिनाभरापासून पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी प्रयत्न करत आहे, मात्र  लिसांनी अर्ज प्रलंबित ठेवल्याने मोठी घटना टळली आहे.


ISIS, ज्याला इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS), Daish, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), ISIS विलायत खोरासान, आणि इस्लामिक स्टेट म्हणूनही ओळखले जाते. इराक आणि शाम खोरासान (ISIS-K), सक्रियपणे भारतविरोधी अजेंडा राबवत आहे आणि हिंसक कृत्यांच्या मालिकेद्वारे देशभरात दहशत आणि हिंसाचार पसरवत आहे. या सगळ्या संस्थांमध्ये हे दोघे काही प्रमाणात संलग्न असल्याचं समोर आलं आहे. 


हे ही वाचा :


धक्कादायक! भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर तब्बल अर्धा तास दगडफेक, थरकाप उडवणारा Video Viral


धक्कादायक! तरुणीच्या ऑनर किलींगचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसावर हल्ला, 3 जणांवर गुन्हा दाखल