Chhatrapati Sambhajinagar:  चाेरट्यांना एटीएम मशीन चोरणं महागात पडलं आहे. एटीएम मशीन मुळासकट उखडत गाडीतून चोरून नेणाऱ्या चोरट्यांना गावकऱ्यांनी वाहनाचा पाठलाग पकडल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar crime) घडलीये. 


वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथे गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गावकऱ्यांनी एटीएम चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. लघुसंखेसाठी हे चोरटे थांबले असता, गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी या वाहनाचा पाठलाग केला. या गाडीतील दोघांना नागरिकांनी पकडले असून त्यांचा साथीदार फरार झाला आहे.


गाडीत एटीएम मशीन असल्याचे लक्षात येताच...


गाडीचा पाठलाग करून गावकऱ्यांनी चोरांना पकडले. गावकरी मागे येत असल्याचे कळल्यावर  एक संशयित शेताच्या दिशेने पळाला तर दुसरा आरोपी देवा सुभाष तावडे यांनी विहिरीत उडी मारली. गावकऱ्यांनी या दोघांनाही पकडून बांधून ठेवले होते. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.


गाडीमध्ये एटीएम मशीन असल्याचे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी चोरट्यांना बांधत पोलिसांना संपर्क केला. यानंतर तब्बल एक तासानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले. यावेळी अनेक गावकरी जमा झाले होते. पोलिसांनी चोरांच्या ताब्यातून एटीएम, गाडी व चाकू असा ऐवज जप्त केला आहे. गावकऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले जात आहे. 


चोरांचा एक साथीदार फरार, पोलीसांची माहिती


हे एटीएम मशीन सटाणा रोड, मालेगाव पासून 10 ते 20 किलोमीटर अंतरावरून चोरी करून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून विष्णू रामभाऊ आकात (२९), सातवण तालुका परतुर, जालना व देवा सुभाष तावडे (20),पुंडलिकनगर, छत्रपती संभाजीनगर अशी ताब्यात घेतलेल्या संशयीतांची नावे आहेत. या संशयीतांचा साथीदार पळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.


पैसे उकळण्यासाठी डॉक्टरला ब्लॅकमेल


अहमदनगर (Ahmednagar) शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरला ब्लॅकमेल (blackmail)करुन पैसे उकळण्याच्या उद्देशाने सिराज खान या आरोपीने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी सिराज खान आणि फिर्यादी राजेंद्र बहुधने यांच्यावर काही वर्षांपूर्वी डॉ. प्रदीप तुपेरे यांच्या दावाखान्याबाहेर असलेल्या अतिक्रमण काढण्यावरुन सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा डॉक्टरांमुळेच आपल्यावर दाखल झाला असल्याचे म्हणत आरोपी सिराज खान हा डॉ. तुपेरे यांना ब्लॅकमेल करुन पैसे उकळत होता. तर आता पुन्हा डॉक्टरला भीती दाखवून डॉक्टरांकडून अजून पैसे उकळण्याचा डाव सिराज खान याने आखला. पण अखेर हे सर्व प्रकरण समोर आले आहे. 


हेही वाचा:


Akola : पगार वाढवतो असं सांगत तरुणीकडे शरीरसुखाची मागणी, जीवन प्राधिकरण कार्यालयातील दोन अभियंत्यांवर विनयभंगाचा गुन्हा