छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण समिती (Maratha Reservation Committee) आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान, या दौऱ्यात मराठा समाजाकडे असलेले कुणबी नोंदीचे पुरावे त्यांनी सादर करण्याचे आवाहन या समितीकडून करण्यात आले होते. दरम्यान, आज छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहचलेल्या समितीसमोर मराठा समाजाकडून कुणबी असल्याचे अनेक पुरावे सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावेळी कुणबी नोंद असलेल्या भांडीकुंडी देखील यावेळी पुरावे म्हणून समतीच्या समोर दाखवण्यात आली आहे. 


छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत चाचपणी करण्यासाठी नेमलेली शिंदे समिती पोहचली आहे. ही समिती आजपासून मराठवाड्यामध्ये कुणबीच्या नोंदीची तपासणी करत आहे. या समितीसमोर मराठा बांधवांच्यावतीने काही पुरावे सादर केले जात आहेत. यामध्ये काही पुरातन भांडी ज्यावर कुणबी अशी नोंद आहे ही देखील  दाखवण्यात आली. तसेच ही भांडीकुंडी पुरावे ग्राह्य धरून मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आली. 


विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली...


मराठा समाजाला कुणबी प्रमाणात देण्याबाबत नियुक्त केलेली माजी न्यायमूर्ती शिंदे समिती छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झाली आहे. यावेळी त्यांची विभागीय आयुक्त, मंत्रालय सहसचिव, उपसचिव आणि कक्षा अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली आहे. यावेळी मराठवाडा विभागातील सर्व निवासी उपजिल्हाधिकारी सुद्धा बैठकीला उपस्थित होते. मराठवाड्यामध्ये गेल्या महिन्याभरात मिळालेल्या कुणबी दाखल्यांचे समितीसमोर सादरीकरण केल जात आहे.


पुरातन भांडी पुरावे म्हणून ग्राह्य धरण्याची मागणी...


छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेल्या मराठा आरक्षण समितीसमोर मराठा समाजाकडून पुरातन भांडी सादर करण्यात आल्या असून, ज्यावर कुणबी असल्याच्या नोंदी आहे. दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीच्या या जुनी भांडी आहेत. त्या काळात भंडारा किंवा लग्नात अशी मोठ-मोठी भांडी वापरली जात होती. विशेष म्हणजे ही भांडी वैयक्तिक नव्हत्या, त्या समाजाच्या सर्वजनिक कार्यक्रमात वापरल्या जात होत्या. त्यामुळे त्यावर कुणबी अशा नोंदी करण्यात आल्या होत्या. तर, ही पुरातन भांडे आणि त्यावर कुणबी नोंदी लक्षात घेता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. 


मराठा आरक्षण समिती मराठवाड्याच्या दौऱ्यावर....


मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत चाचपणी करण्यासाठी सरकारने मराठा आरक्षण समितीला मराठवाड्याच्या दौऱ्यावर पाठवले आहे. त्यामुळे आजपासून 23 ऑक्टोबरपर्यंत ही समिती मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात जाऊन बैठक घेणार आहे. सोबतच त्या त्या जिल्ह्यातील मराठा समाज बांधवानी कुणबी असल्याच्या नोंदी असल्यास त्या समितीसमोर सादर करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Breaking News: मराठा आरक्षण समिती आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर, छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार बैठक