छत्रपती संभाजीनगर : छगन भुजबळ (chhagan bhujbal) महाराष्ट्रला लागलेला कलंक आहे. याला फक्त पाहुण्याचा पुळका येतो, असा हल्लाबोल मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) केला आहे. अंतरवलीतील (Antarwali Sarathi) लोक घरात कोंडून मारले, तेव्हा हा झोपला होता का? भेदभाव करत नाही तर मग अंतरवालीत का आला नाही, असा सवाल मनोज जरांगेंनी गेलाय. बीडची (Beed) दंगल यांनीच घडवून आणली. याला बळ देऊ नका, असे म्हणत मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) राज्य सरकारला आवाहन केलं. मागील काही दिवसांपासून आरक्षणावरुन मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये खडाजंगी सुरु आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आज छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhaji nagar, औरंगाबाद) येथे भाषणादरम्यान जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधला.
भुजबळांना फडणवीसांचं बळ - जरेंगांचा आरोप
छगन भुजबळ यांना बळ देऊन मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, यांचं एकूण तुम्ही आमच्या लोकांना अटक केली. यांचं ऐकून मराठ्यांच वाटोळं करू नका. भुजबळांनी महाराष्ट्र्र सदन खाल्लं, तरी केस तुम्ही मागे घ्यायला लागलेत. सगळा महाराष्ट्र खाल्ला आहे. फडणवीस साहेब बुजबळांना बळ द्यायला लागले असं दिसत आहे. भुजबळ बोलला त्यामुळेच गावा गावात जातीय तणाव निर्माण होत आहे, असे मनोज जरांगे म्हणालेत.
आम्ही शांततेच आव्हान करतो आणि तुम्ही लोकांना भडकवतात. तुम्ही जर असंच करत राहिले तर आम्हाला मोठं आंदोलन उभं करावं लागेल. हे मराठ्यांच्या किती हिताचे आहेत, हे मराठयांना माहीत आहे. सगळं खाल्लं. फडणवीस साहेब याला बळ देत असल्याने भाजपसाठी हा चांगला संदेश नाही. आरक्षण ही केंद्र आणि राज्याची सुविधा आहे. यांचं ऐकू नये. हा माणूस प्युअर जातीयवादी आहे. हा लहान जातींना सुद्धा आरक्षण खाऊ देत नाही, असे जरांगे म्हणाले.
भुजबळ मंत्री म्हणायच्या लायकीचे नाहीत -
धनगर, वंजारी यांच्या आरक्षणाला आम्हाला आरक्षण दिलं तर धक्का लागत नही, हा कामातून गेलेला आहे. भुजबळ मंत्री म्हणायच्या लायकीचे नाहीत. आम्हाला आश्वासन देण्यासाठी तिन्ही गटाचे लोक होते, आमच्याकडे सगळे कागदांचे फोटो आणि व्हिडीओ आहेत. एक महिन्यात गुन्हे मागे घेऊ असं सांगितलं, अटक करणार नाही असं सांगितलं. भुजबळांचं ऐकून निष्पाप पोर राज्यभर अटक केली, असा आरोपही केला.
फडणवीसांना आवाहन -
फडणवीस यांच्याबद्दल अजूनही चांगला समज आमच्यात आहे. पण भुजबळ बोलायला लागल्यापासून ते लक्ष देत नाहीत. बच्चू कडू याला साक्षीदार आहेत. भुजबळ बोलल्याने आमची लोकं अटक केली. त्यांच्या विरोधातील केस परत घेतल्यानंतर आमहाला वास येतो. फडणवीस साहेब तुमच्या बद्दल मराठ्यांमध्ये नाराजी पसरवू देऊ नका. अन्यथा तुम्हाला प्रचंड जड जाईल. मराठ्यांचा रोष घ्यवा लागेल, असा सल्ला जरांगे यांनी दिलाय.