Manoj Jarange on Girish Mahajan, छत्रपती संभाजीनगर : "ज्याच क्षेत्रच नाही ती लोक बैठका लावत आहेत. मला आणखी एक डाव टाकूद्या,गिरीश महाजनला (Girish Mahajan) बेल्ट लावायला वेळ मिळणार नाही. नुसता मराठवाडा निघाला तर यांचे दंडुके काहीच काम करणार नाही. 20 तारखेला तारीख जाहीर करू, त्या दिवशी 288 पाडायचे की उभे करायचे आणि मुंबई ला कधी जायचे हे ठरवू." असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) म्हणाले. मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात झाला. यावेळी ते बोलत होते.  


मनोज जरांगे म्हणाले, ओबीसी आमदारांना मत करणाऱ्या मराठा आमदारांना जाब विचारा. मंडल कमिशन बरखास्त होऊ शकत, मला ओबीसीच वाटोळं करायचं नाही. 40 वर्ष लढणाऱ्यानी आणि सरकार ने काहीच दिले नाही, पण 10 महिन्यात काही ना काही मिळालंय ना?  दीड कोटी मराठे ओबिसीत आलेत", असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. 


सरकारने मला उघड पडायचा प्रयत्न केलाय


मनोज जरांगे म्हणाले, सरकारने मला उघड पडायचा प्रयत्न केलाय. याला एक तर बदनाम करा नाहीतर घातपात करा. छगन भुजबळ तू पायावर चालतो मी डोक्यावर चालतो. ही फक्त मराठवाड्यातील गर्दी, गिरीश महाजन सारख्याना हरवणे सोपे नाही, प्रत्येक वेळेस सरकार फसलय, असंही जरांगे यांनी सांगितलं. 


20 तारखेला 288 उभे करायचे का हे ठरवण्यात येईल


एक संधी सरकारला द्यायची. 20 तारखेला 288 उभे करायचे का हे ठरवण्यात येईल यासाठी अमूक अमूक मैदानावर यावं असे ठरवू. मला जो मारायला येणार आहे, त्याने फक्त मी जागी असल्यावर ये एका बुक्कित दात पाडेल, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. 


आमचे आरक्षण आम्हाला द्या, आम्हाला राजकारणाचे देणेघेणे नाही


20 तारखेला स्थगित केलेल उपोषण सुरू करणार आहे. त्या दिवशी उमेदवार द्यायचे का नाही हे ठरवणार सरकारला पुन्हा एकदा संधी द्यायची आहे. पुन्हा 20 तारखेला मी आमरण उपोषण करणार आहे. सरकारला सांगणे आमचे आरक्षण आम्हाला द्या आम्हाला राजकारणाचे देणेघेणे नाही. 18 आणि 19 तारीख दोनच दिवस माझ्या हातात आहेत. मी उद्याच उद्या निर्णय घेणार होतो, पण उद्या दर्शनाला जात आहे. सरकारने आज रात्री विचार करावा. छगन भुजबळला दंगली घडवायच्या आहेत, असंही जरांगे यांनी सांगितलं.