छत्रपती संभाजीनगर : हिंगोलीत (Hingoli) होणाऱ्या ओबीसी मेळाव्याला काही तासांत सुरवात होणार असून, त्यापूर्वी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर निशाणा साधला आहे. "भुजबळांना टीका करण्यासाठी माझ्याशिवाय कोण आहे? संताजी, धनाजी सारखा मिच दिसतोय. संताजी, धनाजी जसे त्यांना पाण्यात दिसत होते. तसा मी दिसतोय आणि माझा समाज दिसतोय अशी टीका जरांगे यांनी केली आहे. 


मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीस आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी आज हिंगोलीत ओबीसी मेळावा होत आहे. ज्यात मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती महत्वाची असणार असून, त्यांच्याकडून मनोज जरांगे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. "भुजबळांना टीका करण्यासाठी माझ्याशिवाय कोण आहे?, संताजी-धनाजी सारखा मिच दिसतोय. जसे संताजी, धनाजी पाण्यात दिसत होते, तसा मी दिसतोय आणि माझा समाज दिसतोय, असे जरांगे म्हणाले. 


आजची सभा बघणार नाही...


दरम्यान हिंगोलीत होत असलेल्या सभेवर प्रतिक्रिया देतांना जरांगे म्हणाले की, "लोकशाहीत सर्वांना सभा घेण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे कामच खूप आहे, त्यामुळे आजची सभा बघणार नाही. लोकं खुप भेटायला आले आहे. सलाईन लावले आहे, आज उद्या उपचार घेणार आणि त्यानंतर आंतरवालीत आंदोलना ठिकाणी जाईल, असे जरांगे म्हणाले. 


प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मान्य...


मनोज जरांगे यांनी सल्लागारांचे सल्ले ऐकून चालू नयेत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. यावरच बोलतांना जरांगे म्हणाले की, "प्रकाश आंबेकडर यांना मी पण खूप मानतो. आमच्या समाजातील अनेक तरुण त्यांना मानतात. जे काही आहे ते स्पष्टच बोलतात. त्यांचा स्पष्टपणा सर्वांनी पाहिला असून, मी सुद्धा त्यांच्या स्पष्टपणाला मानतो. पण माझ्यामागे कोणी सल्लागार नाही. आंबेकडर यांचा सल्ला मी मान्य केला आहे. माझ्या आणि त्यांच्या वयात खुप तफावत आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता, काही जणांनी एका समुदायाकडे तो नेला. सर्व समाजाबद्दल मला आदर आहे. मला वेगळं म्हणायचं होतं, पण काही जणांनी राजकारण केलं. आंबेडकरांचा सल्ला मान्य, पण विनाकारण अंगावर ओढून घेतलं अस करायला नको. एखाद्याचा मोठा लढा आहे, त्याच्याविषयी संभ्रम राज्यात नको निर्माण करायला पाहिजे,” असेही जरांगे म्हणाले. 



इतर महत्वाच्या बातम्या: 


OBC Sabha : 'हो आजची उत्तर सभा, जरांगेंच्या टीकेला प्रत्युत्तर देणार'; बबनराव तायडे स्पष्टच बोलले