Chhatrapati Sambhajinagar: आपण केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून (BJP) नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने अभियान राबवले जातात. दरम्यान भाजपच्या नेत्या तथा महिला-बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या उपस्थितीत आजपासून असाच काही हटके अभियानाला सुरुवात होणार आहे. 'सेल्फी विथ लाभार्थी' (Selfie With Beneficiary) असे या उपक्रमाचे नाव असणार असून, विविध योजनेच्या लाभार्थ्यांच्या सोबत स्मृती इराणी या सेल्फी (Selfie) घेणार आहेत. तर देशभरात अशा एक कोटी महिलांसोबत त्या सेल्फी घेणार आहेत. विशेष म्हणजे अभियानाची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून होणार आहे. 


G-20 परिषदेच्या (G-20 Conference) च्या अनुषंगाने स्मृती इराणी या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दाखल झाल्या आहेत. दरम्यान यावेळी त्या विदेशी पाहुण्यांसोबत बैठकीत हजर राहणार आहेत. मात्र याचवेळी त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी सरकारच्या विविध योजनेच्या महिला लाभार्थ्यांना स्मृती इराणी यांच्यासोबत सेल्फी घेण्याची संधी मिळणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. 


तर 'सेल्फी विथ लाभार्थी' असे अभियान स्मृती इराणी यांच्याकडून राबवलं जाणार असून, याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर शहरातून होत आहे. दरम्यान देशभरातील एक कोटी महिला लाभार्थ्यांसोबत स्मृती इराणी या सेल्फी घेणार आहेत. तर शहरातील तापडिया नाट्यमंदिर येथे काही वेळात महिला मेळावा सुरु होणार असून, या ठिकाणी या अभियानाला सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील अनेक लाभार्थी महिला उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. तर यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) देखील उपस्थित राहणार आहेत. 


G-20 परिषदेला स्मृती इराणी हजर 


यंदाच्या G-20 परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे. त्यामुळे देशातील वेगवेगळ्या महत्वाच्या शहरांमध्ये G-20 परिषदेच्या बैठका पार पडताना पाहायला मिळत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात देखील आज आणि उद्या असे दोन दिवस बैठक होणार आहे. यासाठी वेगवेगळ्या देशातील महिला सदस्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. तर G-20 राष्ट्रसमूहाच्या वुमन-20 परिषदेला आजपासून सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे वुमन-20 च्या उद्घाटनपर बैठकीला महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून G-20 महिलांची परिषद; 15 देशांच्या महिला प्रतिनिधींची उपस्थिती