Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar) गंगापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, कुत्र्याच्या हल्ल्यातील (Dog Attack) जखमी चिमुकल्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. गंगापूरच्या कोडापूर येथील एका साडेतीन वर्षीय चिमुकल्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला होता. ज्यात तो जखमी झाला होता. दरम्यान 22 दिवसांच्या उपचारानंतर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. धनराज पांडुरंग सरोदे (वय साडेतीन वर्षे) असं या मुलाचं नाव असून, सोमवार (20 फेब्रुवारी) रोजी पिसाळलेल्या कुत्र्याने धनराजच्या चेहऱ्यावर चावा घेतला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार (20 फेब्रुवारी) रोजी धनराज घरच्या शेतात आई सुरेखा सरोदे यांच्यासोबत गव्हाला पाणी भरण्यासाठी गेला होता. सुरेखा सरोदे ह्या गव्हाला पाणी भरत असताना धनराज बाजूला खेळत होता. दरम्यान त्यावेळी अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने धनराजवर हल्ला चढवला. या कुत्र्याने धनराजच्या चेहऱ्याला भीषण चावा घेतला होता. अचानक झालेल्या या प्रकाराने लहानगा धनराज गंभीर जखमी झाला. आणि हल्ल्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. तर धनराज याला तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. तिथे चेहऱ्यावरील जखमांवर इलाज करुन त्यास रेबिज आणि टीटीचे इंजेक्शन देण्यात आले.
दरम्यान या हल्ल्यात धनराज याच्या चेहऱ्यावर खूप जखमा झाल्या होत्या. गालावरील जखमा खोलवर असल्याने धनराजला त्रास होत होता. त्याच्याव डॉक्टरांनी उपचार करत त्याला बरं करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण मुलांची प्रकृती ठीक होत नसल्याने त्यास घरी नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. परंतु, अखेर धनराजचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे 22 दिवसांच्या उपचारानंतर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.
मृत्यूशी झुंज अपयशी ठरली...
शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या आईसोबत शेतात गेलेल्या धनराजवर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्याने गावात मोठी खळबळ उडाली होती. तर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत होते. तर या हल्ल्यात धनराज गंभीर जखमी झाला होता. पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्या तोंडाचे अक्षरशः लचके तोडले होते. त्यामुळे त्याच्या अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या. तर गालावरील जखमा खोलवर असल्याने धनराजला प्रचंड त्रास होत होता. अशात गेल्या 22 दिवसांपासून त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. विशेष म्हणजे त्याला प्रकृती ठीक होत नसल्याने त्यास घरी नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र 22 दिवसांच्या उपचारानंतर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :