Nath Shashti Festival 2023: राज्यात पंढरपूरनंतर दुसऱ्या क्रमांकाची वारी समजली जाणाऱ्या पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यास (Nath Shashti Festival) आजपासून सुरवात झाली आहे. तर दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या नाथांच्या नाथनगरीत 424 वा नाथ षष्ठी सोहळा साजरा करण्यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांसह लाखो भाविक छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) पैठणमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. तर या सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायाच्या पाचशेच्यावर दिंड्या रविवारी (12 मार्च) फाल्गुन वद्य पंचमीच्या मध्यरात्रीपर्यंत दाखल झाल्या होत्या. त्यामुळे पैठण नगरी भानुदास एकनाथाच्या गजराने दुमदुमून गेली आहे. 

Continues below advertisement

आज (13 मार्च) रोजी श्री संत एकनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा असल्यामुळे नाथ वंशजाच्या मानाच्या दिंड्यासह वारकऱ्यांच्या दिंड्यांनी गावातील नाथ मंदिर ते बाहेरील नाथ समाधी मंदिर दर्शन नगर प्रदर्शना केली. या सोहळ्यासाठी पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक उपस्थित असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे षष्ठीच्या दिवशी पहाटे दोन वाजता श्री विजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात आला. नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी दुपारी 12  वाजेच्या सुमारास गावातील मंदिरातून श्री एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करत असते. 

असा साजरा होते नाथ षष्ठी?

संत एकनाथ महाराजांची पुण्यतिथी फाल्गुन वद्य षष्ठी ही आहे. त्यामुळे दरवर्षी या निमित्ताने मोठा उत्सव साजरा केला जातो, ज्याला नाथ षष्ठी सोहळा म्हणून ओळखले जाते. तसेच अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सवाची समाप्ती होत असते. या महोत्सवात राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक दिंडीने यात सहभागी होत असतात. नाथषष्ठी यात्रा महोत्सवात पहिल्या दिवशी नाथवंशांच्या प्रमुख उपस्थितीत दिंड्या आणि आतील नाथ मंदिरातून गोदावरी नदीमार्गे समाधी मंदिरापर्यंत भजन करीत जातात. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री नाथांच्या पादुकांची छबिना पालखी काढण्यात येतो. तिसऱ्या व शेवटच्या दिवशी सायंकाळी नाथवंशजांच्या हस्ते काला दहिहंडी फोडून नाथषष्ठी यात्रा महोत्सवाची सांगता केली जात असते. तर आजपासून तीन दिवस हा सोहळा पार पडणार आहे. 

Continues below advertisement

रावसाहेब दानवेंनी फुगडी खेळून आनंद लुटला!

आजपासून सुरु झालेल्या पैठणच्या नाथ षष्ठीसाठी (Nath Shashti Festival) वारकऱ्यांसह लाखो भाविक पैठणच्या नाथनगरीत दाखल झाले आहेत. दरम्यान याचवेळी आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी देखील या सोहळ्यात उपस्थितीत राहून नाथांचे दर्शन घेतले. यावेळी दानवे यांच्यासह भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) देखील उपस्थित होते. तर यावेळी या दोन्ही नेत्यांनी नाथ षष्ठी सोहळ्यात फुगडी खेळून आनंद लुटला.  तर त्यांच्या याच फुगडीचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Nath Shashti Festival: पैठणच्या नाथषष्ठी यात्रेला सुरुवात; नाथांच्या पवित्र रांजणात पाणी भरण्यास सुरवात