Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या (Chhatrapati Sambhaji Nagar Bench) आदेशानंतर शहरातील सिडको-हडकोतील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटवा पथकाने आतापर्यंत शेकडो अतिक्रमणावर हातोडा घातला आहे. तर अनेक पक्के बांधकामावर जेसीबी फिरवण्यात आला आहे. तर मागील 26 दिवसांत तब्बल 650 अतिक्रमणे हटविण्याची कारवाई महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे. 


शहरातील वाढत्या अतिक्रमणावरून छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने महापालिकेचे वेळोवेळी कान टोचले आहे. तर काही दिवसांपूर्वी मनपाच्या अधिकाऱ्यांना दंड देखील सुनावला होता. त्यामुळे महानगरपालिकेने शहरातील सिडको-हडकोसह शहरातील सर्वच अतिक्रमणाविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. महापालिकेने 2 मार्चपासून कारवाई सुरू केली असून, कारवाईसाठी स्वतंत्र दोन पथके स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान मागील 26 दिवसांत तब्बल 650  अतिक्रमणे हटविण्याची कारवाई महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे. तसेच यापुढे देखील अशीच कारवाई सुरु राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


मागील काही दिवसातील कारवाई...



  • आरसीसी बांधकाम : 65 कारवाई  

  • दुकाने, गॅरेज,टपऱ्या : 50 कारवाई 

  • पत्र्याचे शेड, रसवंत्या, शटर, जाळीचे शेड : 210 

  • चारचाकी व हातगाड्या : 65 

  • संरक्षण भिंत, लोखंडी गेट : 15 

  • जाहिरातींचे डिजिटल बोर्ड व पोस्टर : 98 

  • रस्ताबाधित अतिक्रमणे, ओटे, झेंडे इ. अतिक्रमणे : 130 


आणखी 26 अतिक्रमण काढले...


छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत बुधवारी पुन्हा 26 अतिक्रमणे काढण्यात आली. ज्यात सिडको एन-09, श्रीकृष्ण नगर, हडको, टीव्ही सेंटर सेंटर ते सावरकर चौक पोलीस अधीक्षक कार्यालय समोरील रस्त्यावर बांधकामे आणि लोखंडी जीने टाकून अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे रस्त्यावर एकूण 26 मालमत्ता धारकांनी तर, काही नागरिकांनी ऑड शेपच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण केले होते. त्यामुळे अतिक्रमण विभागाने कारवाई करत ते काढून घेतले आहे. 


अतिक्रमणाची पाहणीसाठी स्वतः आयुक्त उतरले रस्त्यावर


छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरातील अतिक्रमण काढण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने,महापालिका प्रशासन कामाला लागली आहे. दरम्यान सिडकोतील अतिक्रमण हटाव कारवाईचा आढावा घेण्यासाठी महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी हे स्वतः रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी अचानक शहरातील कॅनॉट प्लेस भागात तासभर फिरून पाहणी केली. यावेळी वॉक वे गिळंकृत करणाऱ्या चार हॉटेल चालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील आयुक्त चौधरी यांनी यावेळी दिले. तसेच या भागात अनधिकृत पार्किंग होऊ नये याबाबत त्यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना आदेश दिले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Chhatrapati Sambhaji Nagar : महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेची प्रियकरासह रेल्वेसमोर उडी; तरुणाचा मृत्यू