Prakash Mahajan On Uddhav Thackeray : गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्याचं राजकारण फडतूस आणि काडतूस या दोन शब्दांच्या अवतीभवती फिरत आहे. तर यावरुन आरोप-प्रत्यारोप देखील होत आहेत. दरम्यान यावरुन अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. अशातच आता फडतूस आणि काडतूसवरुन सुरु असलेल्या राजकारणावर मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकाही केली आहे. स्वतःच हिंदुत्व श्रेष्ठ ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे महिलांची ढाल पुढे करत आहेत असा आरोप महाजन यांनी केला आहे. 


दरम्यान यावर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, सध्या सत्तेला सर्वकाही समजले जात आहे. मात्र ती सत्ता गेल्यावर माणसाची हताशा, निराशा या सगळ्या गोष्टी आता वक्तव्यातून बाहेर पडत आहेत. जुन्या काळी सत्ता हे सेवेचं साधन समजले जात होते. त्यामुळे सत्ता असली काय आणि नसली काय यामुळे त्या लोकांना फरक पडत नव्हता. जुन्या नेत्यांमध्ये मोठा संयम होता. सत्ता असताना संयम होता आणि गेल्यावर देखील संयम होता. सत्ता गेल्यावर ते कधीच निराश होत नव्हते आणि दुसऱ्या क्षणाला कामाला लागायचे. पण आता कधीकाळी एकमेकांचे सहकारी राहिलेले नेते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. 


'उद्धव ठाकरे महिलांची ढाल पुढे करत आहेत' 


उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांसोबत काम केले आणि सरकार चालवले आहे. फडणवीस यांच्यासारखं सुसंस्कृत आणि संयमी माणसाचे एखाद्या गोष्टीमुळे त्यांचे मूल्यमापन करुन फडतूस म्हणणे योग्य नाही. फडणवीस हे एका वैधानिक पदावर आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा सल्लागार कोण आहे असा प्रश्न मला अनकेदा पडतो. तर गेल्या काही दिवसांपासून स्वतःच हिंदुत्व श्रेष्ठ ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे महिलांची ढाल पुढे करत आहेत. किती विचत्र प्रकार आहे. 


आधी फुल अन् आता फडतूस...


दरम्यान पुढे बोलताना महाजन म्हणाले की, "जेव्हा दुसऱ्या मातोश्रीचे बांधकाम सुरु होते, त्यावेळी एफएसआयवर काही प्रश्नचिन्ह होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सोडवले होते. त्यावेळी फडणवीस फुल होते, मात्र आता ते फडतूस झाले. त्यामुळे आता फडणवीस यांनी सांगावे की, ते खरं होते की खोटे होते. जनतेला कळू द्या, तुम्हाला फडतूस म्हणतात आणि तुम्ही काडतूस असाल तर एखादी गोळी चालवून दाखवा."



इतर महत्वाच्या बातम्या : 


मंदिराला वाचवण्यासाठी नव्हे तर स्वत:ला वाचवण्यासाठीच खासदार इम्तियाज मंदिरात; सकल हिंदू एकीकरण समितीचा दावा