Chhatrapati Sambhaji Nagar Corona Update: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) कोरोनाची आकडेवारी वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाची (Corona ) लागण झालेल्या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (Death) झाला आहे. मयत महिला सुंदरवाडी येथील असून, शुक्रवारी (24 मार्च रोजी)  पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या महिलेवर 16 मार्चपासून शासकीय घाटीत उपचार सुरु होते. शहरात चार महिन्यानंतर कोरोनामुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे.


छत्रपती संभाजीनगर शहरातसह राज्यात H3H2 (इन्फल्युएंझा) आजाराने चिंता वाढवली असतानाच आता शहरात कोरोनाही वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण गेल्या काही दिवसात सतत वाढत असल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान क्षयरोग असलेल्या सुंदरवाडी येथील 65  वर्षीय महिलेला घाटीत दाखल केल्यानंतर त्यांना न्यूमोनिया झाला. त्यानंतर फुफ्फुसातही जंतुसंसर्ग झाला आणि त्याचा हृदयावरही परिणाम झाला. या महिलेला आधी थायरॉइडचा देखील त्रास होता. तसेच  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. 


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला महिनाभरापासून सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास होता. श्वास घेण्यास अडचण होती. तसेच ताप कमी होत नसल्यामुळे त्यांना शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली. दरम्यान घाटीत दाखल केल्यावर त्या महिलेची 17  मार्च रोजी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर कोरोना वॉर्डात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. 


आणखी 10 कोरोना बाधित


गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात कोरोनाचा आकडा सतत वाढताना पाहायला मिळत आहे. तर आधीच शहरात एन्फ्लुएंझा एच-3, एन-2 व्हायरसचा धोका असताना कोरोनाने देखील चिंता वाढता. दरम्यान शुक्रवारी (24 मार्च रोजी) आणखी 10  नवीन रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे सध्या 41  कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


अनेकांवर घरीच उपचार... 


शहरातील कोरोन रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी आणखी नवीन 10 रुग्णांची भर पडल्याने,  सध्या 41  कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र यातील बहुतांश रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे नसल्याने घरीच उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोर्डवर आहे.  पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Corona Update : मास्क वापरा! राज्यात कोरोनाचा धोका वाढला, सक्रिय रुग्णसंख्या 1700 हून अधिक तर तीन जणांचा मृत्यू