Marathwada Farmer Suicide : सरकार बदलत असले तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा (Farmer Suicide) विषय मात्र कायम आहे. तर मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी पाहता चिंतेचा विषय बनला आहे. कारण मराठवाड्यात नवीन वर्षांतील 72 दिवसांत 164 आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात (Beed District) झाल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात 72 दिवसात तब्बल 52 शेतकऱ्यांनी आपल आयुष्य संपवलं आहे. यात नापिकी आणि कर्ज फेडण्याची चिंता हे मुख्य कारण आहे.  

गेल्या तीन ववर्षांपासून मराठवाड्याला सतत अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तर सततच्या नापिकी आणि कर्जाच्या चिंतेने अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करत आहेत. ज्यात मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. 2022 मध्ये एकट्या मराठवाड्यात तब्बल 1 हजार 23 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तर 2023 च्या सुरवातीला देखील मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या काही थांबताना दिसत नाही. कारण मराठवाड्यात नवीन वर्षांतील72 दिवसांत 164 आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात एका आठवड्यात सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

नवीन 72 दिवसांतील शेतकरी आत्महत्या! 

अ.क्र.  जिल्ह्याचे नाव  आत्महत्या संख्या 
1 छत्रपती संभाजीनगर  16
2 जालना  11
3 परभणी  14
4 हिंगोली  03
5 नांदेड  25
6 बीड  52
7 लातूर  10
8 धाराशिव  32
9 एकूण  163

आधी अतिवृष्टी आणि आता अवकाळी...

यावर्षी देखील मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागला आहे. कारण सुरुवातीला अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले. अतिवृष्टीमुळे तर अनेक ठिकाणी शेतात पंधरा दिवस पाणी साचलेले होते. अशात रब्बीत काहीतरी हाती लागण्याची अपेक्षा असताना गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचं मोठं नुकसान केले आहे. ज्यात गव्हाचे पीक तर अक्षरशः आडवे पडले होते.  

इतर महत्वाचे बातम्या : 

Farmers Suicide : कृषीमंत्री सत्तारांच्या सिल्लोडमध्ये पुन्हा शेतकऱ्याने संपवलं जीवन; आठवड्याभरातील सातवी आत्महत्या