Chhatrapati Sambhaji Nagar News: शेतकरी आत्महत्या  (Farmer Suicide) चिंतेचा विषय बनला असून गेल्या काही दिवसात कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुन्हा एका शेतकरी पती-पत्नीने आत्महत्या करत आपल जीवन संपवलं आहे. शेतामध्ये गेलेल्या पतीने गळफास आणि पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संदीप आळेकर व लताबाई आळेकर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी दांपत्याचे नाव आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणारे शेतकरी दांपत्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोयगाव मतदार संघातील महालब्दा गावातील आहे. 


गेल्या काही दिवसात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय बनला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात गेल्या आठवड्याभरात तब्बल सात शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. त्यातच आता आज पुन्हा एका शेतकरी दांपत्याने शेतामधे जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  सोयगाव तालुक्यातील महालब्दा गावातील संदीप आळेकर आणि त्यांच्या पत्नी लताबाई आळेकर यांनी आत्महत्या करत जीवन संपवलं आहे.  संदीप यांनी गळफास तर लताबाई यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.  त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 


शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात....


दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या शेतकरी दांपत्याचा मृतदेह घाटीत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. तर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. तसेच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, अंत्यविधी सुरु आहे. मात्र या शेतकरी दांपत्यानेआत्महत्या सारखं टोकाचे पाऊल का उचलले याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाहीत. मात्र त घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 


शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय... 


कधी अतिवृष्टी, कधी परतीचा पाऊस आणि कधी अवकाळी पावसामुळे शेतकरी सतत संकटात सापडत आहे. मराठवाड्यात तर गेली तीन वर्षे सलग होणाऱ्या अतिवृष्टीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे देखील नुकसान होत आहे. त्यामुळे सततच्या नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलत आहे. त्यातच बँकेचे कर्ज आणि खाजगी सावकरांकडून होणारा त्रास याचे कारण ठरत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


 Abdul Sattar : चार महिने उलटूनही कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातील 62 टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मोबदल्यापासून वंचित