SSC HSC Exam Result: जुन्या पेन्शन योजनेच्या (Old Pension Scheme) मागणीसाठी शासकीय-निमशासकीय कर्मचारी संपावर (Strike) गेले होते. याच संपात शिक्षकांचा (Teacher) देखील सहभाग पाहायला मिळाला. त्यामुळे या संपाचा परिणाम दहावी, बारावीच्या परीक्षेच्या निकालावर (SSC HSC Exam Result) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर विभागात दहावी, बारावीच्या जवळपास दहा लाख उत्तरपत्रिका मूल्यांकनाविना पडून होत्या. तसेच शंभरपेक्षा जास्त उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणी न करता शिक्षकांनी परत बोर्डाकडे पाठवले होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली होती. परंतु, सोमवारी (20 मार्च) रोजी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने उत्तरपत्रिका तपासण्यास शिक्षकांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे दहावी, बारावीचा निकाल वेळेत लागणार असल्याचा दावा शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. 


शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शिक्षकांनी दहावी-बारावीचे पेपर तपासणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे अनेक शिक्षकांनी पेपरचे गठ्ठे मंडळाकडे परत पाठवले होते. छत्रपती संभाजीनगर विभागात तब्बल 15 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून होत्या. मात्र, संप मागे घेतल्यामुळे शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली आहे. तर बारावीची परीक्षा संपली असून, शनिवारी (25 मार्च) रोजी दहावी बोर्डाची परीक्षा संपणार आहे. त्यामुळे सध्या बोर्डाकडून उत्तरपत्रिकांचे संकलन सुरु आहे. तसेच शिक्षकांनी वेळेत उत्तरपत्रिका तपासून देण्याचे आश्वासन बोर्डाला दिले आहे. त्यामुळे दहावी, बारावीचा निकाल नियोजित वेळेत लावण्याचा बोर्डाचा प्रयत्न असल्याचे विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 


विद्यार्थ्यांनी काहीसा दिलासा


वर्षभर कष्ट करून मुलं दहावी-बारावीच्या परीक्षेची तयारी करतात. त्यामुळे परीक्षा झाल्यावर निकाल कधी लागणार याकडे त्यांचं लक्ष लागलेले असतं. मात्र शिक्षकांनी पुकारलेल्या संपामुळे छत्रपती संभाजीनगर विभागात तब्बल 15 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून होत्या. अनेक शिक्षकांनी उत्तरपत्रिका न तपासता गठ्ठे परत पाठवले होते. त्यामुळे यावेळी दहावी-बारावी परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली होती. विशेष म्हणजे, याचे परिणाम पुढील प्रवेश घेताना देखील होण्याची शक्यता होती. परंतु शिक्षकांचा संप मिटला असल्याने उत्तरपत्रिका तपासणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास  सोडला आहे. 


बारावीच्या परीक्षेत 102 कॉपीचे प्रकार 


माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर विभागातून एकूण 1 लाख 68  हजार 263 विद्यार्थ्यांनी 430 केंद्रांवरून परीक्षा दिली. दरम्यान या काळात परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले. परंतु असे असताना देखील विभागात 102 गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे. ज्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 29, बीड 01, जालना 40, हिंगोली 32 असे एकूण 102 गैरप्रकार समोर आले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Unseasonal Rain : विभागीय आयुक्तांचे निर्देश अन् जिल्हाधिकारी पोहचले बांधावर; नुकसानीची केली पाहणी


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI