Chhatrapati Sambhaji Nagar City Police: नामांतराच्या मुद्यावरून छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) सध्या अशांततेचं वातावरण पाहायला मिळते आहे. तर अनेक राजकीय पक्ष देखील या निर्णयाच्या विरोधात आणि पाठींबा देण्यासाठी पुढे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अशा काळात काही लोकांकडून दोन समाजात तेढ निर्माण होतील अशा पोस्ट सोशल मिडीयावर (Social Media) टाकण्यात येत आहे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांचे सायबर सेल (Cyber Cell) सोशल मीडियावर करडी नजर ठेवून आहेत. तर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट (Controversial Post) टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येत असून, 50 पेक्षा अधिक लोकांना आतापर्यंत समज देऊन सोडवण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. त्यामुळे सद्या शहरातील वातावरण तापले. राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे विधाने केले जात आहे. अनेकदा अशा परिस्थितीत सोशल मीडियावर पडणाऱ्या पोस्ट देखील वादाचे कारण ठरतात. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांचे सायबर पथक 24 तास सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. तसेच सोशल मीडियावर सामाजिक अशांततेचे वातावरण निर्माण करणाऱ्या पोस्ट करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. तसेच काही पोस्ट डिलीट देखील केल्या जात आहेत.
सोशल मीडिया कंपन्यांना पोलिसांचे पत्र
सोशल मीडियावर सामाजिक अशांततेचे वातावरण निर्माण करणाऱ्या लोकांवर सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत. सोबतच इंटर मीडिटरी सर्व्हिस प्रोव्हाइड जसे गुगल, ट्विटर, फेसबुक, इन्स्टा, यांना देखील पोलिसांनी पत्र पाठवले आहे. सोशल मीडियावर सामाजिक अशांततेचे वातावरण निर्माण करणाऱ्या काही पोस्ट आपल्या निदर्शनास येत असतील, तर त्या कळवण्याचा आवाहन छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी संबधित कंपन्यांना केले आहे.
अन्यथा गुन्हा दाखल होईल!
सध्या शहरातील परिस्थिती पाहता नागरिकांनी सोशल मीडिया वापरताना काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक पोस्ट विचारपूर्वक केली पाहिजे. तसेच कोणतेही फॉरवर्ड पोस्ट खात्री केल्याशिवाय पुढे पाठवू नयेत. तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल किंवा भडकावू अशा पोस्ट करू नयेत. अन्यथा अशा लोकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहे. आत्तापर्यंत 50 पेक्षा अधिक लोकांना समज देऊन सोडवण्यात आले आहेत. तर काही व्यक्तींविरोधात थेट गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या पोस्ट करत असाल तर तुम्हाला देखील कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या: