Chhatrapati Sambhaji Nagar Name Controversy : छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्व विचारधारेच्या प्रमुखांना एकत्र बोलावून सामंजस्याने नामांतराचा विषय मार्गी लावावा. तसेच शांतता आणि सलोखा अबाधित राखण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करणारे पत्र शहरातील उद्योजकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पाठवले आहे. दरम्यान, यावरच आता खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्योजकांनी उडवाउडवीचे उत्तर न देता, नामांतराच्या बाजूने की विरोधात याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी असे जलील म्हणाले आहेत. 


उद्योजकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्राबाबत बोलताना जलील म्हणाले की, ''शहरात काहीही होणार नाही. मात्र नामांतराच्या बाबत व्यापारी आणि उद्योजकांनी एक स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. शहरात शांतता राहावी ही सर्वांचीच अपेक्षा असून, यासाठी आम्ही देखील प्रयत्न करतोय. परंतु नामांतराचा तुम्हाला फायदा की तोटा याबाबत व्यापारी आणि उद्योजकांनी भूमिका स्पष्ट करावी. यासाठी खरं बोलण्याची हिंमत असली पाहिजे. त्यामुळे न घाबरता व्यापारी आणि उद्योजक संघटनांनी भूमिका घ्यावी,'' असे जलील म्हणाले. 


तर पुढे बोलताना जलील म्हणाले की, विकास आणि घाणेरडं राजकारण सोबत होऊ शकत नाही. त्यामुळे नामांतराचा निर्णय विकास नसून घाणेरड राजकारण आहे. त्यामुळे आता उद्योजकांनी उडवाउडवीचे उत्तर देऊ नयेत आणि स्पष्ट आणि सत्य बोलण्याची हिंमत त्यांनी दाखवली पाहिजे.  तर उद्योजकांना खरं बोलण्यात कोणाची भीती वाटत आहे, असा प्रश्न देखील जलील यांनी उपस्थित केला आहे. 


उद्योजकांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात काय म्हटले आहे...



  • जी 20 परिषदेच्या आयोजनामुळे छत्रपती संभाजीनगर शहराचे एक नवे रूप आपण जगाला दाखवू शकलो.

  • यानिमित्ताने जागतिक स्तरावर शहराचे नाव अधिक परिणामकारक पद्धतीने मांडता आले.

  • परंतु गेले काही दिवस शहर नामांतर आणि इतरही काही विषयावर शहर परिसरात अनेक परस्परविरोधी वक्तव्य केल जात आहे.

  • त्यामुळे सर्वसामान्य जनतेत अस्वस्थता निर्माण करू शकेल अशी आशंका वाटते.

  • शहरांमध्ये कोणत्याही प्रकारची सामाजिक अशांतता निर्माण होणे हे कोणालाच परवडणारे नाही.

  • कोणत्याही अशांततेचा पहिला परिणाम दुर्दैवाने व्यापार, उद्योग, पर्यटन आणि पर्यायाने सामान्य माणसाच्या दैनंदिन रोजीरोटीवर होतो.

  • या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेला विराम देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar : नामांतराच्या वादाचे पडसाद आता उद्योगक्षेत्रावर? शहरातील तणावावरून उद्योजकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र