Maharashtra Politics : भारत राष्ट्र समिती (बीआरएस-BRS) पक्षाचे प्रमुख आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी देशभरात पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहे. ज्याची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रापासून केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका (Legislative Assembly-Lok Sabha Elections) डोळ्यासमोर ठेवत केसीआर यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. नांदेड जिल्ह्यात त्यांनी आतापर्यंत दोन सभा घेतल्या आहे. तर तिसरी सभा आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात होत आहे. 24 एप्रिलला ही सभा होणार असून, सभेचं ठिकाणी देखील जाहीर करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) आमखास मैदानात 24 एप्रिल रोजी बीआरएस पक्षाची सभा होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेतून पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.
भारत राष्ट्र समिती (बीआरएस-BRS) पक्ष मराठवाड्यात पाय रोवताना दिसत आहे. नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांच्या सारख्या नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. तर आता शहरातील आमखास मैदानात 24 एप्रिल रोजी बीआरएस पक्षाची सभा देखील होणार आहे. विशेष म्हणजे तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे. तर या सभेत अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी यांचा पक्षप्रवेश देखील केला जाणार आहे. सोबतच आगामी काळात बीआरएस पक्ष जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची माहिती देखील यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे. यावेळी हैद्राबादच्या जहिराबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार बी.बी. पाटील, अरमुर विधानसभाचे आमदार जीवन रेड्डी आणि बोधन विधानसभाचे आमदार शकील आमिर उपस्थित होते.
मराठवाडा केंद्रबिंदू...
भारत राष्ट्र समिती (बीआरएस-BRS) पक्ष मराठवाड्यात पाय रोवताना पाहायला मिळत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्षाला वाढवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. याची सुरवात त्यांनी नांदेडपासून केली. नांदेड जिल्ह्यात के चंद्रशेखर राव यांनी दोन भव्य सभा घेतल्या आहे. अनेक स्थानिक नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. तर आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरवर के चंद्रशेखर राव यांनी लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन मोठे नेते त्यांच्या गळाला लागले आहेत. दरम्यान 24 एप्रिलला होणाऱ्या सभेत देखील अनेक स्थानिक नेते बीआरएसमध्ये प्रवेश घेणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात एन्ट्री करणाऱ्या बीआरएससाठी मराठवाडा मात्र केंद्रबिंदू ठरत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: