Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणावर दुचाकी चोरीच्या घटना समोर येत आहे. तर ग्रामीण भागात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक मनिष कलवानीय यांनी जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी करणाऱ्यांचा शोध घेवून, त्यांना जेरबंद करण्याबाबत सूचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या आहेत. दरम्यान याचवेळी शिवुर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडून आपल्या हद्दीतील चोरी गेलेल्या मोटारसायकल चोरांचा शोध सुरु होता. तर कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे राहणारा आसीफ शेख मुकीत (रा. देवगाव रंगारी कुमार गल्ली ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर)  याच्याकडे चोरीच्या गाड्या असल्याची माहिती संदीप पाटील यांना खबऱ्याकडून मिळाली. 


आसीफ शेख मुकीत हा मोटारसायकल चोरी करत असुन, त्याचेकडे चोरीच्या गाड्या ठेवलेल्या असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने संदीप पाटील यांनी त्याचा शोध सुरु केला. दरम्यान यावेळी पाटील यांनी आपल्या पथकासह देवगाव रंगारी येथील त्याच्या गॅरेजमधुन आसीफला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडे चोरीच्या मोटारसायकलबाबत चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच, त्याने आपल्या आणखी काही इतर साथीदारांच्या मदतीने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. 


साथीदारांच्या मदतीने करायचा मोटारसायकल चोरी...


पोलिसांनी खाक्या दाखवताच आसीफ शेख मुकीत पोपटासारखा बोलायला लागला. यावेळी कबुली देताना तो म्हणाला की, अजय बाळु चव्हाण (रा. मनुर ता. वैजापुर), पारस अशोक पुरे (रा. देवगाव रंगारी ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर), विजय राजु अभंग (रा. मनुर ता. वैजापुर), संदेश अत्तम खिल्लारे (रा. एमआयडीसी घाणेगाव, ता. गंगापुर) यांच्या मदतीने आपण दुचाकी चोरायचो असे तो म्हणाला. तर या पाचही आरोपींनी मिळून छत्रपती संभाजीनगर शहर, मनुर, देवगाव रंगारी करुडी फाटा, धोदलगाव, राजनगांव एमआयडीसी, कसाबखेडा परीसरातुन एकुण 16  मोटारसायकल चोरी केलेल्या आहेत. ज्यांची किमंत जवळपास 4 लाख 55  रुपये आहे. पोलिसांनी या पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर पुढील तपास शिऊर पोलीस करीत आहेत.


यांनी केली कारवाई... 


ही कारवाई पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप पाटील, पो.उप.नि अंकुश नागटिळक, योगेश पवार, सफी आर. आर. जाधव, टि.पी. पवार, पोलीस अमलदार, अविनाश भास्कर, विशाल पडळकर, सुभाष टोक, सविता वरपे, गणेश जाधव, विशाल पैठणकर, सिध्देश्वर इधाटे, शेळके यांनी केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


थरार! चालत्या ट्रकने घेतला पेट, कॅबिनमध्ये आग लागताच चालकाने घेतली उडी