Kannad Ghat : गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याला जोडणारा औट्रमघाट म्हणजेच कन्नडच्या घाटात सतत वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत होता. दरम्यान, याबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) कन्नड-चाळीसगाव दरम्यानचा औट्रमघाट (कन्नड घाट) हा 11 ऑगस्टपासून काही अपवाद वगळता जड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आजपासून कन्नड घाटात जड वाहतुकीला बंदी असणार आहे. विशेष म्हणजे यासाठी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी बंदी असलेल्या वाहनांसाठी तीन पर्याय सुचवले आहेत. तर या काळात उपयोजना म्हणून ठिकठिकाणी पोलीस पॉईंट आणि पेट्रोलिंग वाहन तैनात करण्यात आले आहेत. 


कन्नड घाटातील वाहतूक कोंडीवर औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला आहे. न्यायालयाने औरंगाबाद ते चाळीसगाव दरम्यानचा औट्रम घाटातील वन्यजिव प्राणी रक्षण व सतत होणारी वाहतुक कोंडीमुळे सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होत असल्यामुळे औम घाटातील जड वाहतुक आजपासून बंद केली आहे. तसेच याबाबत प्रभावी अमलबजावणीचे आदेश दिले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाकडुन संबंधित मार्गावर वाहतुकीस अडथळा होणार नाही आणि दोन्ही रोडने वाहतुक सुरळीत चालु राहील याकरीता संभाव्य अडचणीचा प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेण्यात आला आहे. तसेच तीन पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. 


असे असणार पर्याय मार्ग 


पूर्वीचा मार्ग: औरंगाबाद ते कन्नड मार्गे चाळीसगाव-धुळे जाणारी जड वाहतुक
पर्यायी मार्ग: औरंगाबाद ते दौलताबाद टि पॉईट - कसाबखेडा - शिऊर बंगला- तलवाड़ा- नांदगाव मार्गे चाळीसगाव


पूर्वीचा मार्ग: चाळीसगाव - कन्नड औरंगाबाद कडे - येणारी जड वाहतुक
पर्यायी मार्ग: चाळीसगाव - नांदगाव तलवाड़ा- शिऊर बंगला - कसावखेडा - दौलताबाद टि पॉईट औरंगाबाद


पूर्वीचा मार्ग: जळगाव सिल्लोड फुलंबी- खुलताबाद मार्गे कन्नड कडे जाणारी वाहतुक
पर्यायी मार्ग: जळगाव-सिल्लोड फुलंब्री औरंगाबाद मार्गे दौलताबाद टि पॉईट- कसावखेडा-शिऊर बंगला-नांदगाव मार्गे चाळीसगाव जातील.


पोलिसांकडून अशी उपयोजना 


असा असणार बंदोबस्त... 


औरंगाबाद ते कन्नड NH-52 रोडवर जड वाहतुक बंद करण्याकरीता दौलताबाद टी. पॉईट, कसाबखेडा टि पॉईट, देवगाव टि. पॉईट, शिऊर बंगला टि पॉईट, पाणपोई फाटा, तलवाड़ा फाटा, पिशोर नाका हे पॉईट निवडलेले असुन सदर ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. यासाठी 50 बॅरेकेट्स 20 पोलीस अमलदार, 03 क्रेन, 20 पोलीस अंमलदार राखीव ठेवण्यात आले आहेत.


पोलिसांची पेट्रोलिंग सुरु राहणार... 


दरम्यान, बंद केलेल्या व पर्यायी दिलेल्या रोडवरील पोलीस ठाणे खुलताबाद, देवगाव रंगारी, शिल्लेगाव,  शिऊर, कन्नड ग्रामीण या पोलीस ठाणेच्या 5 पेट्रोलींग वाहने सतत पेट्रोलींग करणार आहे. यासाठी 5 पोलीस गस्त व्हॅन, 10 पोलीस अमलदार, 20 अमलदार राखीव ठेवण्यात आले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


वाहतूककोंडी सुटणार! कन्नड घाट हा 11 ऑगस्टपासून जड वाहतुकीसाठी बंद; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश