Kannad Ghat : गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याला जोडणारा औट्रमघाट म्हणजेच कन्नडच्या घाटात सतत वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत होता. त्यामुळे यावर काहीतरी पर्याय काढण्याची मागणी देखील होत होते. दरम्यान, आता याबाबत औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) महत्वाचा निर्णय दिला आहे. कन्नड-चाळीसगाव दरम्यानचा औट्रमघाट (कन्नड घाट) हा 11 ऑगस्टपासून काही अपवाद वगळता जड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी दिले. या वाहनांसाठी पर्यायी मार्गही खंडपीठाने सुचविला आहे. त्यामुळे आता औट्रमघाटातील वाहतूक कोंडीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Continues below advertisement

अॅड. ज्ञानेश्वर बागूल, अॅड. निलेश देसले आणि अॅड. श्रीकृष्ण चौधरी यांनी औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली होती. दरम्यान, शुक्रवारी या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सविस्तर सुनावणी झाली. तर यावेळी औट्रमघाट (कन्नड घाट) हा 11 ऑगस्टपासून काही अपवाद वगळता जड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी दिले. औट्रम घाटातून यापुढे फक्त दुचाकी, चारचाकी वाहने, राज्यातील आणि परराज्यातील महामंडळाच्या प्रवासी बस, लक्झरी बस, आवश्यकता भासल्यास क्रेन, फायर ब्रिगेड गाड्या, शेती उपयोगी ट्रॅक्टर, एम्ब्युलन्स, विशेष परिस्थितीत संरक्षक दलाची वाहने यांनाच वाहतुकीसाठी परवानगी असणार आहे. 

न्यायालयाने दिले असे आदेश...

  • औट्रमघाट (कन्नड घाट)  हा 11 ऑगस्टपासून काही अपवाद वगळता जड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्याचे आदेश.
  • बंदी घालण्यात आलेल्या वाहनांमध्ये ट्रक, ट्रेलर, पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे टँकर, दूध टँकर यांचा समावेश आहे.
  • बंदी घालण्यात आलेल्या वाहनांसाठी औरंगाबाद- दौलताबाद टी पॉईंट- देवगाव रंगारी - शिऊर बंगला-वाकळा-पिंपरखेड-न्यायडोंगरी मार्गे चाळीसगाव हा रस्ता सुचविण्यात आला आहे.
  • एन एच 211 वरील औट्रम घाटात दुरुस्तीला परवानगी देतानाच गौताळा अभयारण्यातून जाणाऱ्या गौताळा घाटाच्या दुरुस्ती व इतर कामांना प्रतिबंध करण्यात आला आहे.
  • या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश औरंगाबाद आरटीओ आणि जळगाव आरटीओ, औरंगाबाद पोलीस अधीक्षक आणि जळगाव पोलिस उपाधीक्षक यांना देण्यात आले आहेत. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा म्हणेन फेटाळून लावले... 

कन्नड घाटाच्या वाहतूक कोंडीबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. दरम्यान यावेळी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी देखील आपली बाजू मांडली. कन्नड घाटातून जड वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध केल्याने टोलचे नुकसान होईल असे म्हणणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी मांडले. दरम्यान यावर बोलतांना न्यायालयाने, या घाटातील वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल, या घाटात घडणारे गुन्हे यांचा संदर्भ देत त्यांचे म्हणणे फेटाळून लावले.

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या: 

Aurangabad News: दंगल घडल्यास एकाचवेळी पोलिसांना अलर्ट देणारं ॲप; कसा कराल वापर?