Jayakwadi Dam Water Level : मागील काही दिवसांत होत असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi Dam) पाणीसाठ्यात (Water Level) देखील वाढ होतांना पाहायला मिळत आहे. वरील धरणातून सुरु असलेल्या पाण्याचा विसर्ग पाहता जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा यावर्षी प्रथमच 40 टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. तर, सध्या धरणात 10 हजार 392 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. 


गेल्या चार-पाच दिवसांपासून नाशिकसह जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे, नाशिक जिल्ह्यातील सर्वच महत्वाची धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर, वरील याच धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे, जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणात सध्या एकूण 1611.208 दलघमी पाणीसाठा असून, यापैकी 873.102 दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा समजला जात आहे. सोबतच जालना आणि छत्रपती संभाजीनगर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील वर्षभरासाठी सुटला आहे. 


जायकवाडी धरणाची आजची आकडेवारी (27 सप्टेंबर 2023) 



  • जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1508.90 फूट 

  • जायकवाडी धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 459.913 मीटर 

  • एकूण पाणीसाठा दलघमी : 1611.208 दलघमी

  • जिवंत पाणीसाठा दलघमी : 873.102 दलघमी

  • जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 40.22 टक्के 

  • जायकवाडी धरणात पाण्याची आवक :  10392 

  • जायकवाडी धरण बाष्पीभवन : 0.410

  • उजवा कालवा विसर्ग : 00 क्युसेक 

  • डावा कालवा विसर्ग : 00 क्युसेक 


चार महिन्यात 18 टीएमसी पाण्याची आवक...


मागील तीन वर्षांपासून सतत जायकवाडी धरण 100 टक्के भरत आहे. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. कारण, आधीच मान्सून उशिरा आला, त्यात अपेक्षित पाऊस झालाच नाही. त्यामुळे याचे परिणाम जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यावर देखील झाले. कारण, यंदा जायकवाडी धरण संपूर्ण पावसाळा संपत आला असतानाही धरणाचा पाणीसाठा 50 टक्क्यांपर्यंत देखील पोहचू शकला नाही. मात्र, अधूनमधून झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात काही प्रमाणात पावसाची आवक झाली आहे. 1 जून ते आजपर्यंत या धरणात एकूण 512.63 दलघमी म्हणजेच 18.10 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. मात्र, ही आवक किंचित असून, अजूनही जोरदार पावसाची अपेक्षा कायम आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhajinagar Rain Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले; शहरात तासाभरात 60 मि.मी पावसाची नोंद