Chhatrapati Sambhajinagar Rain Update : यंदा मान्सून (Monsoon) उशिरा दाखल झाला आणि त्यात सुरवातीपासूनच अपेक्षित पाऊस (Rain) झाला नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हा अक्षरशः रेड झोनमध्ये गेला होता. मात्र, मागील दोन-तीन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शहरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. तासाभरात झालेल्या पावसाने शहरात पाणीच-पाणी पाहायला मिळाले. तर, चिकलठाणा वेधशाळेने रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुमारे 60 मि.मी. पावसाची नोंद घेतली. विशेष म्हणजे या पावसामुळे विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. 


गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस होत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी देखील अनेक भागाला पावसाने झोडपून काढले. तर, शहरात तासाभरात 60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सिडको- हडकोसह चिकलठाणा, मुकुंदवाडी, गारखेडा परिसर, शिवाजीनगर, सातारा-देवळाई, उल्कानगरी, क्रांती चौक, जुना मोंढा, पैठणगेट, गुलमंडी, रोशनगेट, कटकटगेट, टीव्ही सेंटर चौक, हर्सल, भीमनगर-भावसिंगपुरा, पदमपुरा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, विद्यापीठ परिसरासह शहराच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. 


रस्त्यांवर पाणीच पाणी 


पावसाळा सुरु होण्यापूर्वी नालेसफाई केल्याचे प्रत्येकवेळ महानगरपालिका दावा करते. यावर कोट्यावधी रुपये खर्च केल्याचे बिल देखील निघतात. परंतु, शहरात जोरदार पाऊस झाल्यावर अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे चित्र निर्माण होत असते. मंगळवारी झालेल्या पावसामुळे देखील शहरात पाणीच पाणी पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तसेच, खल भागाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.


ग्रामीण भागात देखील सर्वदूर पाऊस...


मंगळवारी छत्रपती संभाजीनगर शहरात ज्याप्रमाणे जोरदार पावसाने हजेरी लावली, त्याचप्रमाणे ग्रामीण भागात देखील पावसाने हजेरी लावली.  काही भागात गेल्या तीन दिवसांपासून सलग जोरदार पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोरदार पावसामुळे विहिरींना देखील पाणी आले असून, पाणीपातळी सुद्धा वाढली आहे. विहिरींना आलेल्या पाण्यामुळे रब्बी पिकांना याचा फायदा होणार आहे. सोबतच खरीपच्या पिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच ग्रामीण भागातील प्रकल्पात देखील यामुळे पाणीसाठा वाढतांना दिसत आहे. यामुळे अनेक ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला असून, पाणी प्रश्न मिटला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Marathwada Rain Update : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यातील 50 मंडळात अतिवृष्टी; आठ मंडळात 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस