Jayakwadi Dam Update : नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पाऊस आणि धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होताना पाहायला मिळत होती. मात्र, पाऊस थांबताच जायकवाडी धरणात येणारी आवक देखील घटली आहे. रविवारी संध्याकाळी 6 वाजता धरणात 15 हजार 925 क्युसेकने पाण्याची आवक सुरु होती. मात्र, आज सकाळी 6 वाजता आवक घटली असून, 13 हजार 78 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात सध्या 34.28 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे जायकवाडी धरणाच्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही कालव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 


यंदा मान्सून उशिरा आला, त्यात जून आणि ऑगस्ट महिना कोरडा गेला. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात देखील झपाट्याने घट होत आहे. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील गोदावरीला पूर आले होते. तसेच अनेक धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने गोदावरीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक सुरु झाली होती. रविवारी संध्याकाळी 6 वाजता धरणात 15 हजार 925 क्युसेकने पाण्याची आवक सुरु होती. मात्र आता आवक घटली असून, 13 हजार 78 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. 


जायकवाडी धरणाची पाणीसाठा परिस्थिती (सकाळी 6 वाजेपर्यंत) 


धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1507.18 फूट 
धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 459.388 मीटर 
एकूण पाणीसाठा दलघमी : 1482.335 दलघमी
जिवंत पाणीसाठा दलघमी : 744.229 दलघमी
जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 34.28टक्के 
जायकवाडी धरणात पाण्याची आवक :  13 हजार 78 क्युसेक 
जायकवाडी धरण बाष्पीभवन : 0.583


मागील वर्षी आजच्या दिवशीचा पाणीसाठा 


मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा दलघमी : 2102.871 दलघमी
मागील वर्षी आजच्या दिवशीची उपयुक्त टक्केवारी : 96.86 टक्के 
1 जून 2023 पासुन एकूण पाण्याची आवक : 304.71 दलघमी (10.76टीएमसी)
1 जून 2023 पासुन एकूण सोडलेला विसर्ग : 1.041 दलघमी


मोठ्या पावसाची अपेक्षा... 


ऑगस्ट महिना कोरडा गेल्यावर सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अखेर पावसाने हजेरी लावली. मात्र दोन-तीन दिवस झालेला पाऊस पुन्हा दिसेनासा झाला आहे. त्यामुळे अजूनही धरणातील पाणीसाठा वाढतांना दिसत नसल्याचे चित्र आहे. जायकवाडी धरणात गेल्यावर्षी आजच्या दिवशी 96 टक्के पाणीसाठा होता. मात्र, आता यंदा तोच पाणीसाठा 34 टक्क्यांवर थांबला आहे. त्यामुळे अजूनही औरंगाबादसह मराठवाड्यात मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


जोरदार पावसानंतर जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू; पुढील काही तासांत आवक आणखी वाढण्याची शक्यता