औरंगाबाद : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्यभरात पुन्हा एकदा पाऊस (Rain) सक्रीय झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, मागील दोन तीन दिवसांत वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, यामुळे आता धरणातील पाणीसाठी देखील वाढण्याची शक्यता आहे. मागील काही तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाण्याची आवक सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. जायकवाडी धरणात आज सकाळी 6 वाजेपर्यंत 2 हजार 733 क्युसेकने आवक सुरु असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे काही धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरणातील पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. 


जायकवाडी धरणाची पाणीसाठा परिस्थिती



  • धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1506.68 फूट 

  • धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 459.236 मीटर 

  • एकूण पाणीसाठा दलघमी : 1444.872 दलघमी

  • जिवंत पाणीसाठा दलघमी : 706.766 दलघमी

  • जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 32.56 टक्के 

  • जायकवाडी धरणात पाण्याची आवक :  2 हजार 733 क्युसेक 

  • जायकवाडी धरण बाष्पीभवन : 0.00 


मागील वर्षी आजच्या दिवशीचा पाणीसाठा 



  • मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा दलघमी : 2123.171 दलघमी

  • मागील वर्षी आजच्या दिवशीची उपयुक्त टक्केवारी : 97.80 टक्के 

  • 1 जून 2023 पासुन एकूण पाण्याची आवक : 260.04 दलघमी (09.19टीएमसी)

  • 1 जून 2023 पासुन एकूण सोडलेला विसर्ग : 1.041 दलघमी


नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस...


नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा वाढत आहे. तर गोदावरी नदीला देखील पूर आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने दुपारी 2 वाजता विसर्ग 520 क्यूसेकने वाढवून 1040 क्यूसेक करण्यात आला आहे. तर संध्याकाळी 6 वाजता 4074 क्यूसेक्स होता, रात्री 8 वाजता 2208 क्यूसेकने वाढवून एकूण 6282 क्यूसेक करण्यात आले. तसेच, नांदूरमधमेश्वर धरणातून 1614 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे याचा फायदा जायकवाडी धरणाला होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यावर ते पाणी जायकवाडी धरणात येत असते. त्यामुळे पावसाचा असाच जोर सुरु राहिल्यास जायकवाडी धरणातील पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Maharashtra Rain : मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, पिकांना मिळालं जीवदान