संभाजीगनर: जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ पोलीस (Police) निरीक्षक संदीप गुरमे आज तिसऱ्यांदा आयर्न मॅन बनले. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी हा पराक्रम नोंदवित हा किताब मिळविला. व्हिएतनाममधील फुकॉक येथे रविवारी झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत 6 तास 59 मिनिटे आणि 50 सेकंद असा वेळ नोंदवत त्यांनी ही स्पर्धा सलग तिसऱ्यांदा यशस्वीरीत्या पूर्ण केली. भारतीय वेळेनुसार पहाटे 4.35 वाजता ही स्पर्धा सुरू झाली. समुद्रात दोन किलोमीटर पोहणे (५२.२३ मिनिटे), 90 किलोमीटर सायकलिंग (३ तास २१ मिनिटे ती सेकंद) आणि 21 किलोमीटर धावणे (२ तास ३४ मिनिटे २९ सेकंद ) ही कामगिरी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली.

Continues below advertisement

जगभरातील अत्यंत कठीण स्पर्धांमध्ये आयर्न मॅन या स्पर्धेचा समावेश होत असतो. ऍथलेटच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा कस पाहणारी ही स्पर्धा खूप कमी स्पर्धक पूर्ण करू शकतात. व.पो.नि. संदीप गुरमे हे जालना येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे कार्यरत असून एक सक्षम पोलिस अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. ते एकेकाळचे गुणवत्ताप्राप्त एनसीसी कॅडेट होते. अ‍ॅथलेटिक्सची त्यांची आवड त्यांनी बालपणापासून जपलेली आहे. निर्व्यसनी व शाकाहारी व्यक्तिमत्त्व असलेल्या श्री. संदीप गुरमे यांनी विरळ ऑक्सिजन असलेल्या मनाली ४००० फूट उंची ते लेह लडाख खारदूगला १८००० फूट उंचीवर ५५० किमी सायकलिंग २०१९ मध्ये करण्याचा विक्रम नोंदविला आहे. गुरमे यांनी याआधी सन 2022 आणि 23 मध्ये सलग दोन वर्षे इस्टोनिया मधील टल्लीन येथील स्पर्धांमध्ये सहभागी होऊन  आयर्न मॅन किताब पटकावला होता. गुरमे हे सक्षम पोलीस अधिकारी असून विविध महत्वपूर्ण तपास कार्यांमध्ये त्यांनी अलौकिक कामगिरी बजावली आहे. या स्पर्धेसाठी जालना पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अशोक बनकर यांच्यासह पोलिस खात्यातील विविध अधिकारी आणि गुरमे यांच्या मित्र मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा

एका पक्षप्रवेशासाठी मंत्री हेलिकॉप्टरने आले अन् गेले; गुवाहटी फेम शहाजी बापूची भाजपवर बोचरी टीका

Continues below advertisement