छत्रपती संभाजीनगर : इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांची भेट घेतली. बाबाजी भक्तपरिवाराच्या पाठिंब्यासाठी जलील भेट घेतली आहे. याआधी संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यसह अपक्ष उमेदवारांनीही शांतीगिरी महाराजांची भेट घेतली होती. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात (Chhatrapati Sambhaji Nagar Constiteuncy) शांतिगिरी महाराज यांना जवळपास दीड लाख मते मिळाली होती. 2009 ला संभाजीनगरमधून शांतीगिरी महाराजांनी निवडणूक लढवली होती. 2009 ला शांतीगिरी महाराजांना जवळपास दीड लाख मते मिळाली.


इम्तियाज जलील यांनी घेतली शांतीगिरी महाराजांची भेट


बाबाजी भक्तपरिवाराच्या पाठिंब्यासाठी उमेदवार वेरुळात शांतीगिरी महाराजांच्या भेटीसाठी पोहोचले. संदिपान भुमरे, इम्तियाज जलील यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी बाबाजींची भेट घेतली. छत्रपती संभाजीनगरमधून शांतिगिरी महाराजांचा पाठिंबा कुणाला याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शांतिगिरी महाराज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पाठिंबा जाहिर करणार आहेत, त्यामुळे ते नेहमी काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल.


संदिपान भुमरेही शांतीगिरी महाराजांच्या भेटीला पाठिंबा कुणाला?


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उभा असलेल्या उमेदवारांनी बुधवारी वेरुळ येथे श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांची भेट घेवून जय बाबाजी भक्त परिवाराचा पाठिंबा मिळावा, अशी विनंती केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जय बाबाजी भक्त परिवाराची राजकीय दृष्ट्या निर्णय घेण्यासंदर्भात महत्त्वाची मीटिंग बुधवारी आयोजित केली होती. या निमित्ताने श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांची श्री क्षेत्र वेरूळ येथे उपस्थिती होती.


शांतीगिरी महाराजांचा पाठिंबा कुणाला?


यादरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा लोकसभा उमेदवार संदिपान भुमरे, विद्यमान खासदार इम्तियाज जलील, अपक्ष उमेदवार डॉ. जीवन राजपूत, अपक्ष उमेदवार जेके जाधव, अपक्ष उमेदवार संजय भास्कर शिरसाट आणि शिर्डी मतदार संघातील अपक्ष उमेदवार भारत संभाजी भोसले या सर्वांनी शांतिगिरी महाराजांचा आशिर्वाद घेतला. 


अक्षय्य्य तृतीयेच्या मुहूर्तावर पाठिंबा जाहीर करणार


बैठकीमध्ये सात मतदारसंघांमध्ये पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. हा निर्णय अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर 10 तारखेला जाहीर करण्यात येणार असून तो निर्णय सर्व प्रसिद्धी माध्यमांना अधिकृतपणे कळवण्यात येईल. आज कुठल्याही उमेदवारासंदर्भात पाठिंबाचा निर्णय झालेला नाही, अशी माहिती जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने राजकीय समितीचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली आहे. 


पाहा व्हिडीओ : इम्तियाज जलील शांतीगिरी महाराजांच्या भेटीला



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Shantigiri Maharaj : अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांना मिळालं 'बादली' चिन्ह, नाशिक लोकसभेत देणार टफ फाईट