HSC Result of Marathwada : बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक अखेर संपली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Result of Marathwada) हाती येऊ लागलाय. राज्यात 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत राज्यातील बारावीच्या मुलांच्या परिक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेसाठी एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. 8,10,348 मुले तर 6,94,652 मुली आणि 37 तृथीयपंथीय या परिक्षेला बसले होते. एकूण 10550 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी 3373 मुख्य केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 92.24 टक्के लागलाय तर लातूर विभागाचा निकाल 89.46 टक्के लागलाय.
विभागनिहाय निकाल
- कोकण : 96.74 टक्के
- पुणे : 91.32 टक्के
- कोल्हापूर : 93.64 टक्के
- अमरावती : 91.43 टक्के
- छत्रपती संभाजीनगर : 92.24 टक्के
- नाशिक : 91.31 टक्के
- लातूर : 89.46 टक्के
- नागपूर : 90.52 टक्के
- मुंबई : 92.93 टक्के
यंदा निकालाचा टक्का घसरला
फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37% होता
फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के आहे.
निकालाचा टक्का 1.49 ने यंदा कमी झाला आहे.
कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल?
विज्ञान- 97.35 टक्के
कला- 80.52 टक्के
वाणिज्य- 92.68
व्यवसाय अभ्यासक्रम- 83.03 टक्के
आयटीआय- 82.03 टक्के
इतर महत्त्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI