Marathwada Rain Update : मागील काही दिवसांत मराठवाड्यात (Marathwada) पावसाचा खंड पडल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र, मागील तीन-चार दिवसांपासून जोरदार पावसाने (Heavy Rain)हजेरी लावल्याने विभागातील अनेक भागात नद्या-नाल्यांना पुर आले आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील 6 जिल्ह्यातील 50 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यापैकी आठ मंडळात 100 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला असल्याची नोंद झाली आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 20 पैकी आठ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. 


कोणत्या जिल्ह्यातील मंडळांत अतिवृष्टी?


छत्रपती संभाजीनगर: भावसिंगपुरा 76 मि.मी., कांचनवाडी 111 मि.मी., चितेपिंपळगाव 151 मि.मी., हर्सूल 78 मि.मी,कचनेर 67 मि.मी., पंढरपूर 76 मि.मी., वडकाझी 65 मि.मी., आडूळ 81 मि.मी., पिंपळवाडी 70 मि.मी., बिडकीन 124 मि.मी.,डोणगाव 206 मि.मी., वैजापूर 70 मि.मी., शिऊर 106 मि.मी., लोणी 65 मि.मी., गारज 124 मि.मी., लासूरगाव 71 मि.मी., देवगाव 65 मि.मी. वेरूळ 125 मि.मी., आमठाणा 70 मि.मी., तर अंभई मंडळात 118 मि.मी. पाऊस झाला.


जालना जिल्हा : जालना ग्रामीण 131 मि.मी., शेवली 75 मि.मी., रामनगर 71 मि.मी. पाचनवडगाव 71 मि.मी., अंबड 66 मि.मी.. धर्मापुरी 104 मि.मी., जामखेड 90 मि.मी., रोहिलागड 77 मि.मी., बदनापूर 154 मि.मी., तर रोशनगाव मंडळात 101 मि.मी. पाऊस झाला.


बीड जिल्हा : आष्टी 68 मि.मी., कडा 93 मि.मी., दालवडगाव 89 मि.मी., धानोरा 132 मि.मी., पिंपळा 72 मि.मी., अंबाजोगाई 72 मि.मी., लोखंडी 72 मि.मी., बर्दापूर 106 मि.मी., तर धर्मापुरी मंडळात 69 मि.मी. पाऊस झाला.


नांदेड जिल्हा : येवती 89 मि.मी., जहूर 89 मि.मी., अंबुलगा 89 मि.मी., शहापूर 84 मि.मी., तर नारंगल मंडळात 84 मि.मी. पाऊस झाला.


परभणी जिल्हा: पाथरी 95 मि.मी., बादलगाव 132 मि.मी., तर मानवत मंडळात 95 मि.मी. पावसाची नोंद झाली.


हिंगोली जिल्हा : दिग्रस 72 मि.मी. अंबा 74 मि.मी. तर येहलगाव मंडळात 72 मि.मी. पावसाची नोंद झाली.


नांदेड जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली...


यंदा मराठवाड्यात सुरवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे विभागातील आठ पैकी 6 जिल्हे रेड झोनमध्ये गेले होते. मात्र, नांदेड जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला होता. त्यात मागील तीन-चार दिवसांपासून होत असलेल्या पावसाने देखील नांदेड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली आहे. नांदेड जिल्ह्यात 780 मिमी पाऊस अपेक्षित होता, तर आतापर्यंत प्रत्यक्षात 820 मिमी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात गेल्या 24  तासांत 19 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर, मुखेड तालुक्यातील 3 व देगलूर तालुक्यातील 2 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nanded Rainfall Update : नांदेड जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली, आतापर्यंत झाला एवढा पाऊस?