Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University: छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) घेतलेल्या निर्णयानुसार अधिष्ठाता मंडळाने भौतिक सुविधा नसलेल्या चार जिल्ह्यांतील नामांकित 113 महाविद्यालयांतील पदव्युत्तरचे प्रवेश थांबविण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. प्रवेश थांबविलेल्या महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री, आमदार, माजी मंत्र्यांच्या संबंधित शिक्षण संस्थांचा समावेश आहे. प्राध्यापकांची नियुक्ती न करणे, कागदोपत्री नियुक्ती केल्यानंतर संबंधितांना वेतन न देणे, बायोमेट्रिक हजेरीसह भौतिक सुविधा नसताना पदव्युत्तर अभ्यासक्रम संबंधित महाविद्यालये चालवित होती. त्याची तीन सदस्यीय समितीने तपासणी केल्यानंतर बोगसपणा उघडकीस आला.
विद्यापीठाच्या विद्यापरिषदेसह व्यवस्थापन परिषदेने 'नॅक' मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांतील पदव्युत्तरचे प्रवेश थांबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राजकीय क्षेत्रातील कार्यरत शिक्षण संस्थाचालकांनी 'नॅक'चे कामकाज बंद असल्याचे कारण देत शासनाकडे मुदतवाढ मागितली. त्यानुसार शासनाने 'नॅक' नसलेल्या महाविद्यालयांना सहा महिने मुदतवाढ दिली. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने संलग्न महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या भौतिक सुविधांची समितीमार्फत पाहणी करण्यात आली.
तीन सदस्यीय समितीने तपासणी केल्यानंतर बोगसपणा उघडकीस
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार अधिष्ठाता मंडळाने भौतिक सुविधा नसलेल्या चार जिल्ह्यांतील नामांकित 113 महाविद्यालयांतील पदव्युत्तरचे प्रवेश थांबविण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. प्रवेश थांबविलेल्या महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री, आमदार, माजी मंत्र्यांच्या संबंधित शिक्षण संस्थांचा समावेश आहे.प्राध्यापकांची नियुक्ती न करणे, कागदोपत्री नियुक्ती केल्यानंतर संबंधितांना वेतन न देणे, बायोमेट्रिक हजेरीसह भौतिक सुविधा नसताना पदव्युत्तर अभ्यासक्रम संबंधित महाविद्यालये चालवित होती. त्याची तीन सदस्यीय समितीने तपासणी केल्यानंतर बोगसपणा उघडकीस आला.
कोणत्या जिल्यातील किती महाविद्यालयांचे प्रवेश थांबविले?
छ. संभाजीनगर 79
जालना 40
बीड 44
धाराशिव 24
विद्यापीठाने कोणाच्या कॉलेजांचे प्रवेश रोखले?
1. हरिभाऊ बागडे
संत सावतामाळी महाविद्यालय, फुलंब्री
2. चंद्रकांत पाटील
आर.पी.महाविद्यालय, धाराशिव
3. पंकजा मुंडे,धनंजय मुंडे
वैजनाथ महाविद्यालय,परळी
4. रावसाहेब दानवे
मोरेश्वर महाविद्यालय, भोकरदन
5. सुप्रिया सुळे
मौलाना आजाद शिक्षण संस्था, कासेल
6. सतीश चव्हाण, प्रकाश साळुंके
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची 5 महाविद्यालये
7. माजी मंत्री राजेश टोपे
मत्स्योदरी शिक्षण संस्था, जालना
8. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
आदर्श शिक्षण संस्था,बीड
9. माजी मंत्री बसवराज पाटील
माधवराव पाटील महाविद्यालय,मुरुम
10. माजी मंत्री राणा जगजीतसिंह
तेरणा महाविद्यालय,धाराशिव
11. माजी मंत्री मधुकर चव्हाण
नळदुर्ग महाविद्यालय, धाराशिव