Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) सार्वजनिक बांधकाम विभागातील नियुक्ती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार समोर आला आहे. गेल्या दहा वर्षांत वरिष्ठ आणि बडतर्फ कनिष्ठ लिपिकाने मिळून कार्यकारी अभियंत्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या वापरुन शिपाई, चौकीदार आणि सफाई कामगार या पदांवर सुमारे 31 जणांच्या शासकीय सेवेत नियुक्त केल्याचे समोर आले आहे. अंकुश श्रीरंग हिवाळे असे वरिष्ठ लिपिकाचे तर उज्वला अनिल नरवडे असे बडतर्फ कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. दोघांविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्कॅन केलेल्या किंवा मॉफिंगद्वारे तयार केलेल्या बनावट स्वाक्षऱ्या
या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव काशीनाथ चव्हाण यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, सन 2015 ते 2025 या कालावधीत छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना आणि लातूर येथील सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत तब्बल 31 जणांना शिपाई, चौकीदार, सफाई कामगार अशा पदांवर नियुक्त करण्यात आले. या नियुक्त्यांसाठी कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नव्हती, ना कुठलीच अधिकृत भरती प्रक्रिया राबवली गेली. तरीदेखील संबंधित कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या स्कॅन केलेल्या किंवा मॉफिंगद्वारे तयार केलेल्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करत खोट्या नियुक्तीपत्रांद्वारे उमेदवारांना शासकीय सेवा मिळवून दिली. याप्रकरणी संबंधित लिपिकांकडून बड्या आर्थिक व्यवहार झाल्याचा संशयही चौकशीतून पुढे आला आहे
चौकशी समितीने उघड केला प्रकार
15 मे 2025 रोजी तत्कालीन कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांच्या आदेशाने एस. बी. बिहारे यांच्या अध्यक्षतेखाली एक 6 सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. समितीत 3 उप अभियंते व 3 अतांत्रिक कर्मचारी यांचा समावेश होता. या समितीने मागील १० वर्षातील सर्व नियुक्त्यांची कागदपत्रे तपासण्यासाठी वरिष्ठ लिपिक हिवाळे याला संबंधित नस्त्या व मूळ फाईल सादर करण्यास सांगितले. मात्र त्यांनी ती सादर न करता कार्यालयीन कपाट बंद करून ठेवले. नंतर कपाटाचा पंचनामा करून कुलूप उघडल्यावर भरतीप्रक्रियेची नस्ती गायब असल्याचे आढळून आले. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव काशीनाथ चव्हाण यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, सन 2015 ते 2025 या कालावधीत छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना आणि लातूर येथील सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत तब्बल 31 जणांना शिपाई, चौकीदार, सफाई कामगार अशा पदांवर नियुक्त करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या: