छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एक संतापजनक प्रकार समोर आला असून, एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर बदनामीच्या भीतीने पीडित तरुणीने विषारी द्रव प्राशन केले असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर दुसरीकडे आरोपी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. मच्छिंद्र रामू घोडके (वय 25 वर्षे) असे आत्महत्या करण्याऱ्या तरुणाचे नाव आहे. 


सिल्लोड तालुक्यातील एका गावात एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. तर, तरुणीच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आपली बदनामी होईल या भीतीने तरुणीने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचे माहित होताच तरुणाने छत्रपती संभाजीनगर शहरात बहिणीकडे आला असतांना गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. 


रूमवर बोलावून बलात्कार केला


पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रमाणे, मच्छिंद्र रामू घोडके मागील काही दिवसांपासून पीडित तरुणीचा पाठलाग करीत होता. तसेच, "तू मला खूप आवडतेस, तू मला भेट, अन्यथा तुझ्या भावाला जिवंत मारून टाकीन, अशी धमकी देत होता. त्यानंतर त्याने 19 वर्षीय पिडीत मुलीला धमकी देऊन भाड्याने घेतलेल्या रूमवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला. याबाबत पीडित मुलीने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मंगळवारी पहाटे बदनामीच्या भीतीने या मुलीने विषारी द्रव प्राशन केले. ही घटना तिच्या नातेवाइकांच्या निदर्शनास आल्यानंतर पीडितेला दुपारी 12 वाजता सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार करण्यात येत आहे


गुन्हा दाखल झाल्याचे कळताच तरुणाने घेतला गळफास...


पोलिस ठाण्यात सोमवारी पिडीत तरुणीने बलात्कार केल्याबाबतची तक्रार दिल्यावरून मच्छिंद्र रामू घोडके विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान रामू घोडके हा मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या बहिणीच्या घरी आला होता. यावेळी आपल्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती त्याला मिळाली. त्यामुळे मंगळवार रात्री बहिणीच्या घरीच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी संभाजीनगर सिडको पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


डॉक्टर पत्नीच्या अपघाताचा रचला बनाव, भावाच्या तक्रारीमुळे सत्य समोर, पतीनंच डोक्यात दगड घालून संपवल्याचा आरोप