Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : सध्या वेगेवेगळ्या पद्धतीने ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे. लिंक ओपन केल्यावर बँक खात्यातून पैसे कमी होण्याच्या देखील अनेक घटना समोर येत आहे. दरम्यान असाच काही प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) समोर आला आहे. पार्सल का आले नाही याची ॲपद्वारे माहिती घेत असताना, आलेली लिंक ओपन केल्यानंतर खात्यातून 90 हजार रुपये कमी झाले असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हर्सूल पोलिसात फिर्याद देण्यात आली असून, गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्बल लाईफ प्रॉडक्टचे बुक केलेले पार्सल का आले नाही याची ॲपद्वारे माहिती घेत असताना अज्ञाताने दिलेली लिंक ओपन केल्यानंतर खात्यातून 90 हजार वळते झाल्याची घटना समोर आली आहे. हर्सूल परिसरातील देवगिरी केशर दीप सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छिंद्रनाथ शेकू कोरडे (रा. देवगिरी केशरदिप हाऊसिंग सोसायटी हर्सूल) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 


अशी झाली फसवणूक...


मच्छिंद्रनाथ कोरडे हे खाजगी नोकरी करतात. त्यांनी हर्बल लाईफचे प्रॉडक्ट बुक केले होते. मात्र हे पार्सल आले नाही. त्यामुळे त्यांनी कुरिअर ट्रॅकर या ॲपमध्ये डिलिव्हरी साईट चेक केली. या साईटच्या हेल्पलाइन वर ट्रेकिंग चेक करत असताना, एका अनोळखी नंबरवरून त्यांना फोन आला. तुम्हाला एक लिंक पाठवली असून, त्या लिंक वर तुम्ही माहिती भरा असे सांगितले. माहिती भरल्यानंतर सदर मोबाईल धारकाने दोन रुपये बँक खात्यात भरा तुमचे पार्सल दिलेल्या पत्त्यावर पाठवण्यात येईल असे सांगितले. 


त्यानंतर संबंधित व्यक्तीने दिलेली माहिती पूर्ण करीत कोरडे यांनी यूपीआय पिन सह दोन रुपये भरले. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलवर एक नंबर ॲड झाल्याचा मेसेज आला व आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून चार वेळा मिळून 39 हजार 972 रुपये कपात झाले. तर 8 फेब्रुवारी फिर्यादीला पुन्हा दुसरा नंबर ऍड झाल्याचा मेसेज आला व आयसीआयसीआय बँकेतून सहा वेळा मिळून 50 हजार 748 रुपये कपात झाले. असे तब्बल 90 हजार 720 रुपये फिर्यादीच्या खात्यातून कपात झाले. याप्रकरणी हर्सूल पोलिसा फिर्याद देण्यात आली असून, आरोपी मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल देवकर हे करीत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: