छत्रपती संभाजीनगर : शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, 25 ववर्षीय डॉक्टर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर प्रकरण न्यायालयात सुरू होते. दरम्यान, चार दिवसांपूर्वी पतीने दुसरे लग्न करून, दुसऱ्या पत्नीसोबतचे लग्नाचे फोटो स्टेटस ठेवल्याने पहिल्या डॉक्टर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. डॉ. आयशा शेख (वय 25 वर्षे) असे मयत तरुणीचे नाव आहे. 


अधिक माहितीनुसार, बुलडाणा येथील डॉ. जैद याच्याशी डॉ. आयशा या तरुणीचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. दोघेही फिजिओथेरपिस्ट असून, लग्नानंतर शहरातील पडेगाव परिसरात राहत होते. त्यांना 2 वर्षांचा मुलगा आहे. सर्व काही सुरळीत सुरु असतानाच पुढे पती-पत्नीमध्ये घरगुती वाद सुरु झाले. वाद आणखीच वाढल्याने आयशा ही पतीचे घर सोडून माहेरी येऊन राहू लागली. वाद आणखीनच टोकाला गेल्याने प्रकरण थेट कोर्टात जाऊन पोहचले. दरम्यान, न्यायालयात वाद सुरु असतानाच डॉ. जैद याने चार दिवसांपूर्वी दुसरे लग्न केले. विशेष म्हणजे, दुसऱ्या पत्नीसोबतच्या लग्नाचे छायाचित्र त्याने स्टेटसवर ठेवले. हे पाहिल्यानंतर आयशा तणावात होती. 


पतीने दुसरं लग्न केल्याने आयशा प्रचंड तणावाखाली होती. त्यामुळे मंगळवारी तिने वडिलांच्या राहत्या घरात पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला उपचारासाठी घाटीत दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. त्यामुळे आयशाच्या माहेरच्या लोकांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. दरम्यान, डॉ. जैद याने दुसरे लग्न केल्याने आयशा तणावात होती. त्यामुळेच तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी शहरातील सातारा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


फोटो पाहिल्यावर होती तणावात... 


डॉ. जैद याच्याशी डॉ. आयशा यांचे सुखी संसार सुरु असतानाच त्यांच्यात घरघुती वाद होऊ लागले. त्यामुळे सुरवातीला दोघांच्या कुटुंबीयांकडून वादावर मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांनी दोघांची समजूत काढली. मात्र वाद शेवटी न्यायालयात जाऊन पोहचले होते. न्यायालयात प्रकरण सुरु असतानाच डॉ. जैद याने दुसरे लग्न केले. विशेष म्हणजे दुसऱ्या लग्नाचे फोटो स्टेटसला ठेवले. त्यामुळे हे फोटो पाहून आयशा तणावात होती. आपल्या पतीने दुसरं लग्न केल्याने तिला दुःख झाले होते. त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलत थेट गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhajinagar : कुलूप लावून वॉचमन निघून गेला, चिमुकली वर्गातच अडकली; सात तासांनी नागरिकांनी केली सुटका