मुंबई : अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा पीए आणि समर्थकांनी सिल्लोडमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केलीय. तसंच त्याला जिवे मारण्याची धमकीही दिलीय. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांच्या तक्रारीवरून मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पीएसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर शिवीगाळ केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्लीविरोधातही सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


समोर आलेल्या माहितीनुसार,  सिल्लोडमध्ये शहरातील सर्वे नंबर 92 मधील केलेल्या आक्षेपार्ह फेरफाराबद्दल तलाठी भवन येथे सुनावणी होती.सुनावणी संपल्यानंतर बाहेर पडल्यावर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर शंकरपल्ली यांनी जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांचे पीए बबलू चाऊस , शाकीर मिया जानी, बबलू पठाण यांच्यासह दोन जणांनी मारहाण केली  आहे.  या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे. अद्याप अब्दुल सत्तार किंवा कार्यालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 


सशस्त्र पोलीस बंदोबस्त द्यावा, महेश शंकरपेल्ली यांची मागणी


सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयात आवारात अब्दुल सत्तारांचे पीए आणि समर्थक यांनी प्राणघातक हल्ला केला आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली. तब्बल दोन वर्षापासून शासनाकडे दोन वर्षापासून अब्दुल सत्तार. परिवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मला,माझ्याा कुटुंबाला आणि मालमत्तेला धोका असल्याची माहिती दिली आहे. अब्दुल सत्तार आणि त्यांचे कार्यकर्ते कधीही माझ्या जीवघेणा हल्ला करू शकतात. मी या संदर्भात अनेक तक्रारी शासनाकडे दिलेल्या आहेत. मला आणि माझ्या परिवाराला सुरक्षा तसेच सशस्त्र पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी मी केली आहे. 


ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल


फिर्यादी राजेश्वर उत्तम आरके (46) यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी खासगी कामानिमित्त नवीन तलाठी भुवन कार्यालयाजवळ गेलो असता महेश शंकरपेल्ली यांनी जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून महेश शंकरपेल्लीविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.  फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.  


हे ही वाचा :