छत्रपती संभाजीनगर: शहरातील महानगरपालिकेच्या प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या दोन्ही महिला उद्यानात कर्मचारी होत्या. तर इतर ५ जण गंभीर जखमी आहेत. प्राथमिक माहितीनुसार स्वाती खैरनाथ,(३५ हल्ली मुक्काम रांजणगाव मुळगाव लासलगाव,रेखा गायकवाड वय ३८ सौभाग्य चौक एन ११ हडको असं मयत झालेल्या महिलांची नावे आहेत.
सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार वादळ आलं, पावसाच्या सरी कोसळल्या. सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा वरचा काही भाग निखळला नागरिकांच्या अंगावर पडला. प्राथमिक माहितीनुसार 5 जण जखमी झाले आहेत. तर, एक जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रवेशद्वाराचं काही वर्षांपूर्वी नुतनीकरण झालं होतं, तो भाग कसा काय कोसळला असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात एक झाड कोसळलं असून एक महिला जखमी झाल्याची माहिती आहे.
दोन महिलांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्य प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानात मोठी दुर्घटना घडली. पावसामुळं प्रवेशद्वाराच्या भिंतीच काही भाग कोसळला आणि या घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर 5 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ज्या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे त्या उद्यानातील कर्मचारी होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं त्या ठिकाणी दाखल झाले होते.
जोरदार वादळ, पावसच्या सरी आणि दुर्घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये सायंकाळच्या वेळी जोरदार वादळ आलं होतं. त्यानंतर पावसाच्या सरी देखील कोसळल्या. या दरम्यान सिद्धार्थ उद्यानातील प्रवेशद्वाराच्या भिंतीचा भाग कोसळला आणि यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला.
दरम्यान, सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या नुतनीकरणाचं काम काही वर्षांपूर्वी झालं होतं. मात्र, इतक्या लवकर त्याचा भाग कोसळला असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून इतर 5 जण जखमी आहेत. या घटनेची जबाबदारी पालिका प्रशासनाकडून घेतली जाते का ते पाहावं लागेल.