छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) तोतया आयएएस कल्पना भागवत प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. कल्पना भगवताचा मित्र आणि अफगाणी नागरिक अशरफ खील याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे. स्वतःला केंद्रीय गृहमंत्र्यांचा ओएसडी म्हणवून घेत खुलेआम फिरणाऱ्याला दिल्लीहून ताब्यात घेण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar)  पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या दोघांच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.(Chhatrapati Sambhajinagar) 

Continues below advertisement

सहा महिन्यांपासून पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणाऱ्या तोतया आयएएस महिला अधिकारी कल्पना भागवतच्या मोबाईलमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांचा ओएसडी म्हणून मिरवणाऱ्या अभिषेक चौधरीच्या काल (शुक्रवारी, ता २८) रात्री तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी अटक केला आहे. कल्पनाचा प्रियकर महंमद अशरफ खिल रात्रीच पकडला गेला. दोघेही दिल्लीतच सापडले. अभिषेकच्या संपर्कात कल्पना होती. सोमवारपासून तपास यंत्रणांचे चार पथक दिल्ली, नोएडा, हरियाणा, राजस्थान सीमेवर त्याचा कसून शोध घेत होती. शुक्रवारी रात्री या तोतया ओएसडीला पकडण्यात तपास यंत्रणांना यश आले. संबंधित तोतया अधिकारी व कल्पनाचा प्रियकर एकमेकांच्या संपर्कात आहेत का, हा तोतया देखील विदेशी लोकांच्या संपर्कात आहे का, यासाठी एक स्वतंत्र पथक तपास करत आहे.

तिचे प्राथमिक शिक्षण झालेल्या वैजापूर येथील शाळेकडून देखील आता गुप्तचर यंत्रणांनी तिच्याबाबतची सर्व माहिती मागवली आहे. विद्यापीठ प्रशासनाकडूनही तिच्या नियुक्तीसंदर्भात व बडतर्फीबाबत कागदपत्र मागवले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह एटीएस, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून कल्पनाची कसून चौकशी सुरू आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश, सौदी अरेबियिाच्या संपर्क क्रमांकावर कल्पनाने किती वेळा संपर्क केला, त्या क्रमांकावरून तिला कॉल आले का, याची माहिती मिळवण्यासाठी आता शहर पोलिसांनी नेटवर्क कंपन्यांना ई-मेलद्वारे माहिती मागितली आहे. चौकशीदरम्यान कल्पना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

Chhatrapati Sambhajinagar: कल्पना भागवत तिचे पोलिस तपासादरम्यान समोर आलेले कारणामे

- सदरील महिला ही जयपूर दिल्लीला सातत्याने गेल्याचे समोर आलं आहे.- ती दिल्लीच्या पावर मिनिस्ट्रीमध्येही अनेकांना भेटली. गृह विभागातही अनेकांना भेटल्याचा तिचा दावा आहे.- ज्यांना व्हिजा मिळत नाही त्यांना व्हीजा मिळून देण्याचं ती आश्वासन देते.- मोठ्या बदल्याचं काम करण्याचं आश्वासन देखील ती देते.- पुण्यातील एका माजी कुलगुरूचं ही बेस्ट आयएस अधिकारी, सामाजिक काम असल्याचे सर्टिफिकेट तिच्याकडे आहे. तिने ते बनवलं का खरोखर दिल याचा पोलीस तपास करत आहेत.- लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये ती राहत होती. तिचा मित्र अफगाणचा आहे, तो तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे.- सदरील मित्राची आई आणि भाऊ पाकिस्तानमध्ये राहतो या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.- महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना भेटल्याचा तिचा दावा आहे.- प्रति दिवस सात हजार रुपये भाडं असलेल्या शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सहा महिन्यांपासून आईसोबत वास्तव्यास होती.