Chhatrapati Sambhajinagar : पुणे हिट अँड रण (Pune Accident) प्रकरणानंतर देखील राज्यातील पोलीस (Police) यंत्रणा आणखीनही झोपेत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्याचं कारण म्हणजे पुण्याप्रमाणेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील काल एका राजकीय नेत्याच्या गाडीने दुचाकीवरून जाणाऱ्या बाप लेकाला उडवले. विशेष म्हणजे अपघात झाल्यावर हे नेते मदत करण्याऐवजी पळून गेले. आता घटना होऊन दुसरा दिवस उलटला आहे. मात्र अजूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पुण्यातील घटनेप्रमाणेच संभाजीनगर प्रकरणात देखील पोलीस (Police) यंत्रणा राजकीय दबावाला बळी पडत तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


संभाजीनगरमधील मुलांनी वाडगावात येत बाप लेकाला उडवल्याची घटना


पुण्यातील प्रकरण ताजे असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) सोमवारी (दि.28) असाच प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) मुलांनी वाडगावात येत बाप लेकाला उडवल्याची घटना सोमवारी (दि.27) घडली होती. ही गाडी एका राजकीय नेत्याची असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले होते. अपघातग्रस्त (Chhatrapati Sambhajinagar) बाप लेकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


पोलिसांची घटनास्थळी येऊन पाहाणी 


वाडगावात बाप लेकाला राजकीय नेत्यांच्या गाडीने उडवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातग्रस्त बाप लेकाची प्रकृती चिंताजनक असल्याने पोलिसही घटनास्थळी दाखल असल्याचे बोलले गेले. हा अपघात एवढा भीषण होता की, गाडीच्या टायरांचा अक्षरश: चक्काचूर झालाय. विशेष म्हणजे एवढे सगळं होऊनही नेते अपघातग्रस्तांच्या (Chhatrapati Sambhajinagar) मदतीला आलेले नाहीत. 


जखमी मुलगा काय म्हणाला? 


आम्ही एका लग्नासाठी आमच्या गावी गेलो होतो. परतत असताना माझे वडिल आणि मी दुचाकीवरुन येत होतो. अर्धा रस्त्यात असताना एका पांढऱ्या कलरच्या गाडीने आम्हाला उडवले. कदाचित ते दारु पिलेले होते. आम्ही त्यांना हाताने इशारा करत होतो. तरिही त्यांनी आम्हाला उडवले. त्यानंतर आम्ही खड्ड्यात जाऊन पडलो. आमची मदत करण्यासाठी देखील ते थांबले नाहीत, असं अपघातग्रस्त मुलाने म्हटलं आहे. शिवाय, याप्रकरणी त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही त्याने केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ramdas Athawale : महाराष्ट्रात महायुतीला जोरदार टक्कर आहे, मुंबईत कोणाच्या किती जागा निवडून येणार? रामदास आठवलेंचे बेधडक अंदाज