Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा घाटात दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. त्यातील एक ट्रक 200 फूट खाली दरीमध्ये कोसळला आहे. या अपघात 2 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा घाटात दोन ट्रकमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यानंतर यातील एक ट्रक 200 फूट दरीत कोसळला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, यामध्ये 2 जण जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहाणी झाली नाही. दरम्यान, या दोन ट्रकचा नेमका अपघात कसा झाला? यामध्ये कोणाची चूक होती? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

महत्वाच्या बातम्या:

Kalyan Accident : दादा, माझ्या आईला उठवा ओ! रक्ताने माखलेल्या अवस्थेत मुलाची आर्त हाक, कल्याणच्या अपघातातील काळीज सुन्न करणारा प्रसंग