Chhatrapati Sambhaji Nagar Corona Update: एकीकडे राज्यातील कोरोना परिस्थिती (Corona Update) चिंताजनक होत असतानाच, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) देखील आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत छत्रपती संभाजीनगर शहरात 24 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागांत मिळून जिल्ह्यात सध्या 52 सक्रिय रुग्ण आहेत. ज्यात दोन रुग्ण हे ग्रामीण भागातील असून, 50 रुग्ण शहरातील आहे. तर गेल्या दोन दिवसांत रुग्ण संख्या वाढली असून, ज्यात मंगळवारी (11 एप्रिल) रोजी 12 रुग्णांची नोंद झाली होती. तर बुधवारी आणखी 12 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाची देखील चिंता वाढली आहे. 


राज्यातील कोरोनाचा धोका सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे. बुधवारी एकाच दिवसात राज्यात कोरोनाच्या 1 हजार 115 रुग्णांची नोंद झाली असून कोरोनामुळे तब्बल नऊ जणांना आपला जीव गेला आहे. दरम्यान, अशीच काही परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. कारण गेल्या दोन दिवसांत 24 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 1 ते 12 एप्रिलदरम्यान शंभरपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची देखील चाचणी केली जात आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आल्या असून, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. 


संशयित रुग्ण शोधणे होतेय कठीण 


कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चाचण्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. दरम्यान नव्याने सापडणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची देखील तपासणी करण्यात येत आहे. तसेच लक्षणे असल्यास कोरोना चाचणी देखील करण्यात येत आहे. मात्र बहुतांश रुग्ण आपला मोबाईल नंबर, घराचा पत्ता चुकीचा देत असल्याने रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधणे अवघड होत आहे. त्यामुळे संशयित रुग्ण शोधणे देखील कठीण होत आहे.  


आरोग्य यंत्रणा अलर्ट...


कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आलेला अनुभव घेत आरोग्य विभाग अलर्ट झाले आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने महानगरपालिका प्रशासनाने याबाबत आढावा बैठक देखील घेतली आहे. सोबतच कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच प्रत्येक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच संशयित रुग्णांनी स्वतःहून कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सद्या सणासुदीचे दिवस असल्याने बाजारात किंवा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे देखील आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या : 


Coronavirus: कोरोनाचा धोका वाढला.. राज्यातील रुग्णसंख्या हजारपार, एकाच दिवसात 1,115 रुग्णांची नोंद, नऊ जणांचा मृत्यू