Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या कुत्र्याने 15 जणांना चावा घेतला आहे. त्यामुळे, हातात काठी घेऊन घराबाहेर निघण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तर कुत्र्याच्या भीतीने लहान मुलं घराबाहेर निघण्यास घाबरत आहे. दिसेल त्याचा हा कुत्रा चावा घेत आहे. त्यामुळे परिसरात सध्या प्रचंड भीतीचे वातावरण आहे. तर या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीक सातत्यानं प्रशासनाकडे करत आहेत. 


पिशोर येथील शफेपूर भागात आणि बाजारपेठेत एक पिसाळेला कुत्रा गेल्या काही दिवसांपासून फिरत आहे. मागील तीन दिवसांत या कुत्र्याची प्रचंड दहशत वाढली आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसांत या पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल पंधरा जणांना चावा घेत जखमी केले आहे. यात काहींना गंभीर जखमा झाल्या आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण गावात पिसाळेल्या कुत्र्याची दहशत निर्माण झाली आहे. विशेष गल्लीबोळात फिरणारा हा कुत्रा दिसेल त्याला चावा घेत आहे. आतापर्यंत त्याने 15 लोकांना चावा घेतला आहे. 


आतापर्यंत 15 लोकांना चावा... 


या पिसाळलेल्या कुत्र्याने आतापर्यंत 15 जणांना चावा घेतला आहे. ज्यात अनुष्का कृष्णा ओपळकर (वय 8 वर्षे), पंडित विठ्ठल सपकाळ (वय 53 वर्षे), इम्रान शेख समद शेख (वय 38 वर्षे), मंगेश रावसाहेब जाधव (वय 23 वर्षे), संदीप देवरे (वय 39 वर्षे), तमीरा इनूस पठाण (वय 6 वर्षे), सुयानी शहा (वय 50 वर्षे), पुंजजी मोकासे (वय 8 वर्षे), बाळू राठोड (वय 49 वर्षे), रजजाक शहा (वय 7 वर्षे), दीक्षांत कानफाटे (वय 47 वर्षे), भावेश माढेकर (वय 9 वर्षे), वासुदेव हलदार (वय 52 वर्षे), अब्दुल शेख, रज्जाक शेख (वय 43 वर्षे), आर्यन निवृत्ती मोकासे (वय 7 वर्षे) या पंधरा जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 


नागरिकांमध्ये प्रचंड दहशत...


पिशोर येथील शफेपूर आणि बाजारपेठ भागात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांना चावा घेतला आहे. या कुत्र्यांची नागरिकांसह बालकांमध्ये प्रचंड भीती पाहायला मिळत आहे. अनेक जणांना जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडावे लागत आहे. विशेष लहान मुलांना घराबाहेर पडतांना पालकांना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. कारण या कुत्र्याने आतापर्यंत ज्या लोकांना चावा घेतला आहे त्यात काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्यासह गावात मुक्तपणे भटकणाऱ्या कुत्र्यांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकरी करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Chhatrapati Sambhaji Nagar: पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळाला पण नाल्यात जाऊन अडकला; गणवेशासह नाल्यात उतरून पोलिसांनी घेतलं ताब्यात